आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • White Police Officer ‘shot Black Man Dead While He Was Running Away

पोलिस अधिकार्‍यांनी केलेल्या नि:शस्त्र कृष्णवर्णीयाच्या हत्येने अमेरिकेत आक्रोश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या नॉर्थ चार्लटनमध्ये ४ एप्रिल रोजी सकाळी एका पोलिस अधिकार्‍याने पळत असलेल्या एका संशयितावर आपल्या पॉइंट ४५ केबिलर रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडल्या. त्याने एक- दोन नाही, तर तब्बल आठ गोळ्या झाडल्या. ५० वर्षीय कृष्णवर्णीय वॉल्टर लमेर स्कॉट पळतच होता, मात्र शेवटच्या गोळीने त्याचा बळी घेतला. त्याच्या शरीराच्या मागच्या बाजूला खूप गोळ्या लागल्या होत्या. एका व्यक्तीने आपल्या स्मार्टफोनवर या घटनेचा व्हिडिओ बनवला होता.

हत्याकांडाचा खुलासा झाल्यावर ३३ वर्षीय गौरवर्णीय पोलिस अधिकारी मायकेल थॉमस स्लेगरला अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्या करण्याचा आरोप आहे. स्कॉट नि:शस्त्र होता. त्याच्या कारची ब्रेकलाइट खराब झालेली होती. स्कॉटच्या कुटुंबाचे वकील जस्टिन बॅम्बर्गने आश्चर्य व्यक्त केले की जर व्हिडिओ नसता, तर आपण काय केले असते, या प्रश्नाचे उत्तर महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ समोर येण्यापूर्वी स्कॉटचा मृत्यू अशा प्रकारच्या इतर घटनांप्रमाणेच समोर आणण्यात आला होता. न्यूयॉर्कमध्ये एरिक गार्नर आणि फर्ग्युसनमध्ये मायकल ब्राऊनची हत्या आणि अन्य प्रकरणे पोलिस रजिस्टरमध्ये नावापुरती नोंदवण्यात आली आहेत.

स्लेगरचे काय होईल हे समजणे कठीण आहे.त्याचा जामीन झालेला नाही. त्याच्या वकिलांनी खटला चालवण्याला नकार दिला. तरीसुद्धा पोलिस अधिकार्‍याला शिक्षा देणे कठीण आहे.कोलंबियात एका वर्तमानपत्रात बातमी आहे की, २०१० ते २०१५च्या दरम्यान पाल्मेटो राज्यात पोलिस अधिकार्‍यांनी २०९ संशयितांवर गोळीबार केला. अवैध फायरिंगसाठी फक्त काही अधिकार्‍यांवर खटला चालवण्यात आला, मात्र कुणालाही शिक्षा झाली नाही. एरिक गार्नरला गळा दाबून मारण्याचा ज्या अधिकार्‍यावर आरोप होता, त्याला गेल्या वर्षी सोडण्यात आले.

स्कॉटच्या प्रकरणात देशभर आंदोलने झाली. आंदोलकांचे म्हणणे आहे की, कायम मरणार्‍यालाच दोषी ठरवू नका. अनेक वेळा अधिकार्‍यांकडून चूक होते. पोलिस कृष्णवर्णीय संशयिताला हटकतात. दुसरीकडे वॉशिंग्टन पोलिस युनियनचे अध्यक्ष डेलराय बर्टन म्हणतात, अनेक प्रकरणांत पोलिसांची कारवाई योग्य असते. मात्र, आता प्रत्येक घटनेला वर्णभेदाशी जोडले जाते हे चुकीचे आहे.

अनेक प्रकरणे चर्चेत
२६ फेब्रुवारी,२०१२ - वॉचमॅन जॉर्ज जिमरमॅनने सॅनफोर्डमध्ये वादानंतर १७ वर्षीय ट्रेवॉन मार्टिनची गोळी मारून हत्या केली होती. या घटनेने अमेरिकेत वर्णभेदावर वाद उसळला होता. जिमरमॅनला जुलै २०१३ मध्ये हत्येच्या आरोपातून मुक्त करण्यात आले.

९ फेब्रुवारी, २०१४- ६८ वर्षीय अर्नेस्ट सॅटरव्हाइटवर उत्तर आगस्टात गोरा अधिकारी जस्टिन क्रेवनने गोळी झाडली होती. त्याच्याविरुद्ध खटला सुरू आहे.

३० एप्रिल, २०१४- मिलवाउकीचे पोलिस अधिकारी क्रिस्टोफर मॅनी याने ३१ वर्षीय नि:शस्त्र कृष्णवर्णीय हेमिल्टनवर १४ गोळ्या झाडल्या होत्या. हेमिल्टन मानसिक रुग्ण होता. मॅनीला नोकरीवरून काढण्यात आले मात्र, त्याच्यावर कुठलाही खटला चालला नाही.

१७ जुलै, २०१४- ४३ वर्षीय एरिक गार्नरला न्यूयॉर्कमध्ये पोलिसांनी जमिनीवर पाडले. श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाला. न्यायालयाने पोलिस अधिकारी डॅनियल पेंटालियोला क्लीन चिट दिली.