आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० वर्षांपूर्वीच वर्तवलेले होते ISIS च्‍या उदयाचे भविष्य, मृत्‍यूनंतर बाबा वंगा चर्चेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबा वंगा - Divya Marathi
बाबा वंगा
सोफिया (बल्गेरिया) - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेची स्थापना व त्यांच्या जगभर सुरू असलेल्या कारवायांमुळे आता बल्गेरियातील बाबा वंगा (मूळ नाव : वान्जिलिया पांदेवा दिमित्रोवा) या महिलेचे नाव चर्चेत आले आहे. २० वर्षांपूर्वी आयएसच्या उदयाबाबतचे त्यांनी वर्तवलेले भविष्य तंतोतंत खरे ठरल्याचे सांगितले जात आहे. वॉलकांसची नास्त्रोदेमस म्हणून तिची ओळख होती.

बाबा वंगा यांचे १९९६ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. या दोन्ही डोळ्यांनी अंध महिलेने सन ३००० पर्यंत घडणाऱ्या अनेक घटनांची भविष्यवाणी केली होती.
अनुयायांच्या मते, बालवयातच दृष्टी गेलेल्या वानजिलिया यांना अद्भुत शक्ती प्राप्त होती. १९९६ मध्ये मृत्यूपूर्वी बाबा वंगाने २००१ मधील अमेरिकेवरील हल्ला, २००४ ची सुनामी, आफ्रिकी वंशाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष होईल, २०१६ मध्ये सबंध जगात ‘ग्रेट मुस्लिम वॉर’ होईल. २०१० मध्ये अरब भूमीवर सुरू झालेले हे युद्ध सिरियापर्यंत पोहोचेल व २०४३ मध्ये रोममध्ये खिलाफतची स्थापना होऊन ते थांबेल.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, बाबा वंगा यांनी वर्तवलेली इतर भाकिते