आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत ठार झालेल्या भारतीयाच्या विधवेवर डिपोर्टेशनचे संकट, व्हिसासाठीही धावपळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतीच्या मृत्यूसह त्यांचे नागरिकत्व सुद्धा संपुष्टात आले. - Divya Marathi
पतीच्या मृत्यूसह त्यांचे नागरिकत्व सुद्धा संपुष्टात आले.
ओलाथे / नवी दिल्ली - अमेरिकेतील कांसास येथे वर्णद्वेषी हल्ल्यात ठार झालेले भारतीय अभियंते श्रीनिवास कुचीभोतला यांच्या विधवेला डिपोर्टेशन अर्थात अमेरिकेतून बाहेर काढण्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील एक खासदार आणि इतर काही लोक त्यांना व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत करत आहेत. याच वर्षी 22 फेब्रुवारीला पतीच्या हत्येनंतर सुनयना यांचा अमेरिकेतील नागरिकत्वाचा दर्जा संपुष्टात आला आहे. पतीच्या अंत्यसंस्कारासाठी त्या भारतात आल्या होत्या.
 
 
काय म्हणाले खासदार योडर?
- द कंसास सिटी स्टारशी संवाद साधताना रिपब्लिकन खासदार केविन योडर यांनी सांगितल्याप्रमाणे, "ओलाथे येथे राहणाऱ्या सुनयना दुमाला डिपोर्टेशनचा सामना करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मला धक्काच बसला. निश्चितच त्या चिंतीत आहेत. त्या आपल्या पतीच्या अंत्यसंस्कारासाठी भारतात गेल्या आणि अमेरिकेत परत येऊ शकल्या नाहीत. व्हिसा मिळाल्यानंतर त्यांना अमेरिकेत एखादे मार्केटिंग जॉब मिळून जाईल." 
- योडर पुढे म्हणाले, "आम्ही हेट क्राइम विक्टिमच्या विधवेला आम्ही डिपोर्ट होऊ देणार नाही. त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना अमेरिकेत पुन्हा स्थायिक होण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत."
- सुनयना दुमाला सुद्धा मूळच्या भारतीय आहेत. त्या गेल्या 10 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. 2012 मध्ये त्यांचा विवाह श्रीनिवास यांच्याशी झाला होता. सुनयनाने आपल्या वर्क व्हिसावर एक ग्रीन कार्ड अर्ज केला होता. 
- सुनयनाने द स्टारला केलेल्या ई-मेलनुसार, "22 फेब्रुवारी रोजी मी केवळ आपले पतीच नाही, तर इमिग्रेशन स्टेटस सुद्धा हरवून बसले आहे. अतिशान भाग्यवान ठरले, की माझी मदत खासदार आणि तेथील असंख्या लोक करत आहेत."
 

22 फेब्रुवारी रोजी काय घडले?
- श्रीनिवास आणि आलोक मदसानी ओलाथे येथे जीपीएस बनवणाऱ्या एका कंपनीच्या एविएशन विंगमध्ये अभियंते म्हणून कार्यरत होते. 
- 22 फेब्रुवारी 2017 रोजी हे दोघे ओलाथे येथील Austins Bar & Grill मध्ये होते. त्याचवेळी अॅडम पुरिन्टन नावाच्या एका व्यक्तीशी त्यांची हुज्जत झाली. अॅडम वर्णद्वेषी आणि शिवराळ भाषा वापरत होता. त्याने दोघांना दहशतवादी सुद्धा म्हटले. तसेच आपल्या देशात चालते व्हा, माझ्या देशात काय करत आहात? असा वाद घातला. 
- या वादानंतर बार वाल्यांनी अॅडमला बाहेर काढले. काही वेळातच तो एक बंदूक घेऊन त्याच बारमध्ये परतला. आणि दोघांवर गोळ्या झाडल्या. 
- यानंतरही अॅडम थांबला नाही. तो 5 तासांनंतर पुन्हा बारमध्ये पोहोचला आणि त्या ठिकाणी बसलेल्या लोकांशी बोलताना, आपण मध्यपूर्व देशातील दोन लोकांना ठार मारून आलो असे सांगितले. तसेच लपण्यासाठी जागा मागितली. यानंतर कर्मचाऱ्यांनी लगेच पोलिसांना बोलावून त्याला अटक करायला लावली.
 
बातम्या आणखी आहेत...