आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुगल, अमेरिकेच्या निवडणुकीवर विकिलीक्स गौप्यस्फोट करणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - विकिलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांजने गुगल व अमेरिकेतील निवडणुकीसह इतर अनेक मुद्द्यांवर गुपितांचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा दिला आहे.

पुढचे १० आठवडे हे दस्तऐवज जारी केले जाणार आहेत. विकीलिक्सच्या १० व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने असांजने हे वक्तव्य केले आहे. खरे तर त्यांनी गोपनीय दस्तऐवज नेमके कधी जाहीर केले जातील हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.

गुगल व असांज यांच्यात २०१४ मध्ये या वादाला सुरुवात झाली होती. तेव्हा असांज यांनी एक पुस्तक लिहिले होते. ‘व्हेन गुगल मेट विकीलिक्स’ असे पुस्तकाचे शीर्षक होते. गुगल कंपनी मोठी होण्याबरोबर वाईटदेखील बनली आहे हे मानण्यास मी तयार नसल्याचे त्यांनी पुस्तकातून नमूद केले होते.

दुसरीकडे गुगलवर अमेरिकेतील निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचादेखील आरोप आहे. राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी गुगलवर खळबळजनक आरोप लावले होते. हिलरी क्लिंटन यांच्याशी संबंधित नकारात्मक बातम्यांना गुगल दाबून टाकते, असा आरोप करण्यात आला आहे. त्यावर असांज म्हणाले, कंपनीचे अध्यक्ष श्मिट यांनी अनेक वर्षे क्लिंटन यांच्यासोबत काम काम केले आहे. त्याचबरोबर हिलरी यांचे नुकसान करण्याचा आमचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्टीकरणही असांजकडून देण्यात आले आहे. दरम्यान, असांजने काही कागदपत्रे शनिवारी जाहीर केली. सध्या तो अॅक्वाडोरियनच्या लंडनमधील राजदूत कार्यालयात राजाश्रयाखाली आहे. राजदूत कार्यालयातून त्याने अमेरिकेचा भंडाफोड कार्यक्रम सुरू ठेवणार अाहे, असे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...