आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्तूगालच्या जंगलात 12 ठिकाणी भीषण आग, हजारों लोग बेघर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यासाठी पळताना पोर्तूगाल नागरिक... - Divya Marathi
सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यासाठी पळताना पोर्तूगाल नागरिक...
इंटरनॅशनल डेस्क- पोर्तूगालमध्ये सध्या जंगलात 12 ठिकाणी भीषण आग लागली आहे. यात सहा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली असून तेथील आग विझवणे सध्या अवाक्याबाहेर गेले आहे. वृत्तसंस्था एपीने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, यात तोमार व फेरेरा डो जेजेरे या दोन भागात लागलेल्या आगीने मोठी चिंता निर्माण केली आहे. ही आग विझविण्यासाठी 580 अग्निशमन जवान, 180 गाड्या आणि आठ विमाने आग विझविण्याचे काम करत आहे. आगीमुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. यूरोपीय संघाकडे मागितली मदत...
 
- देशभरात शनिवारी 286 आगीच्या घटना एकाच दिवशी समोर आल्या. त्यासाठी 6,550 हून अधिक अग्निशमन कर्मचारी रवाना केले. 
- पोर्तूगाली अधिका-यांनी शनिवारी यूरोपीय संघाकडे मदत मागितली. स्पेन याआधीच आग विझविण्यास मदत करत आहे.
- पोर्तूगाली नागरिक सुरक्षा यंत्रणांना मदत करण्यासाठी स्पेनने याआधीच दोन लष्करी तुकड्या मदतीला पाठवल्या आहेत. 
- हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील एक-दोन दिवस कोरडी, उष्ण व वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे आग आणखी भडकण्याची शक्यता आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...