आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Skyslide: बघा 1000 फुट उंचावर ग्लास स्लाईडचा अंगावर काटा आणणारा थरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तब्बल 1000 फुट उंचावर असलेल्या ग्लास स्लाईडचा थरार अनुभवताना तरुणी. - Divya Marathi
तब्बल 1000 फुट उंचावर असलेल्या ग्लास स्लाईडचा थरार अनुभवताना तरुणी.
लॉस एंजलिस- मी 13,000 फुट उंचावरुन विमानातून उडी मारली, 400 फुट उंच 100 किलोमीटर प्रति तास या प्रचंड गतीने रोलर कोस्टर राईड केली, रॉक क्लायम्बिंग करताना केवळ नखाच्या टोकावर लटकली, पण येथील युएस बॅक टॉवरवर असलेल्या स्कायस्लाईडची मजा काही औरच आहे अशा बोलक्या भावना एका मीडिया प्रतिनिधीने व्यक्त केल्या आहेत. काल स्कायस्लाईडचे लोकार्पण करण्यात आले. तेव्हा मीडिया प्रतिनिधींना स्कायस्लाईडची संधी देण्यात आली. तेव्हा अनेकांनी हा थरार अनुभवला.
जमिनीपासून सुमारे 1000 फुट उंचावर युएस बॅक टॉवरवर या स्कायस्लाईडची निर्मिती करण्यात आली आहे. याला चक्क 360 डिग्रीची वळणे देण्यात आली आहेत. त्यामुळे त्यावरुन घसरताना जणू आपण जमिनीवरच पडतोय असा भास होतो. प्रचंड भीती वाटते. तरुणींच्या किंचाळ्या अगदी ठरलेल्याच असतात. बरेच जण हळूहळू घसरतात. पण तरीही त्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले असतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, Skyslide चे फोटो आणि व्हिडिओ.... तसेच मीडिया प्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या भावना....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...