आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HOT YOGA गुरु विक्रम चौधरीवर लैंगिक शोषणाचा सहावा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनडा - जगभरात 'हॉट योगा गुरु' नावाने प्रसिद्ध भारतीय वंशाचे विक्रम चौधरी यांच्यावर त्यांच्या एका शिष्येने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पीडित महिला जिल लाव्लरचा आरोप आहे, की गेल्या तीन वर्षात 69 वर्षीय योग गुरु विक्रम चौधरींनी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकला. विक्रम चौधरी परदेशातील प्रसिद्ध योगा ट्रेनर आहेत. त्यांच्या योग प्रशिक्षण वर्गात बिल क्लिंटन यांची मुलगी चेल्सी, मॅडोना, डेमी मूर आणि जॉर्ज क्लूनी यांच्यासारखे हॉलिवूड, राजकीय आणि खेळ जगतातील मातब्बरांनी प्रशिक्षण घेतले आहे. याआधीही विक्रम यांच्यावर आरोप झाले आहेत. या नव्या आरोपासह आता त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे अर्धाडझन आरोप झाले आहेत.

बॉलिवूड फिल्म पाहात केले अश्लिल चाळे
कॅनडा येथील महिला लाव्लरच्या माहितीनुसार, 2010 मध्ये लॉस वेगास येथील योगा ट्रेनिंग सेंटरमध्ये तिने 5.7 लाख रुपये भरून प्रशिक्षण सुरु केले. तेव्हा ती 18 वर्षांची होती, तर विक्रम चौधरी 64 वर्षांचा होता. विक्रम बॉलिवूडचा एक चित्रपट पाहात असताना त्याने मालिश करण्यास सांगितले. कित्येक तास मालिश सुरु होती, तेव्हा त्याचे ताळतंत्र सुटले आणि त्याने माज्यासोबत अश्लिल चाळे केले. त्यानंतर त्याने त्याबद्दल माफी मागितली आणि तुला योगा चॅम्पियन करतो असे आश्वासन दिले. त्यानतंर काही आठवड्यांनी चौधरीने तिला हॉटेलच्या एकारुमवर बोलावले, तिथे त्याने तिच्यासोबत दुष्कृत्य केले. महिलेच्या माहितीनुसार, त्यानंतरही तिने योगा क्लास सुरु ठेवला होता. त्याने अनेकवेळा तिच्यावर अत्याचार केले. जुलै 2014 मध्ये महिलेने योगा सोडला असल्याचे सांगितले. सध्या ती वेट्रेसचे काम करते. तिने म्हटले आहे, की विक्रम चौधरी सेलिब्रिटी आहे, त्यामुळे त्याच्याविरोधात बोलायला घाबरत होते.

काय आहे हॉट योगा?
विक्रम चौधरी त्याच्या फॉलोअर्सला 40 डीग्री सेल्सिअस तापमानात योगाचे प्रशिक्षण देतो. यालाच 'हॉट योगा' म्हटले जाते. चौधरीचे जगभरात 220 देशांमध्ये 720 योगा सेंटर्स आहेत, यावरुनच त्याच्या लोकप्रियता लक्षात येते. एकट्या ब्रिटनमध्ये चौधरीचे डझनावर योगा सेंटर आहेत. टेनिस स्टार अँडी मरेपासून प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहम त्यांच्या खेळातील खराब प्रदर्शनानंतर त्यांच्याशी संपर्क करत आले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोण-कोण होते विक्रम चौधरींचे चाहाते