आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक धर्मगुरू म्हणाले, महिलेजवळ सीट नकाे, जागाही बदलली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्युस्टन - ‘मी फार अगोदर तिकीट आरक्षित केले होते. वेळेवर विमानात पोहोचलेही. मात्र, विमान कंपनीने माझे आसन केवळ मी महिला आहे म्हणून बदलले. कारण, एक पाकिस्तानी धर्मगुरू माझ्याजवळ बसू इच्छित नव्हते. हा कसला भेदभाव? मला वाटत होते स्त्री-पुरुष समानता असलेल्या जगात मी वावरतेय. मात्र, इथे तर महिलांना अपमान सहन करावा लागतो.’

मेरी कॅम्पसने हे पत्र लिहिले आहे. युनायटेड एअरलाइन्सला तिने हे पत्र लिहिले. तेल कंपनीत उच्च पदावर असलेल्या या महिलेने विमान कंपनीवर दावाही ठोकला आहे. ती म्हणाली, मी कॅलिफोर्नियाला जाण्यासाठी विमानात दाखल झाले. कंपनीच्या स्टाफचा एक कर्मचारी मला गेटवरच भेटला. त्याने मला थांबवून माझ्या शेजारी दोन आसने पाकिस्तानी धर्मगुरूंची असल्याचे सांगत ते महिलेजवळ बसू इच्छित नसल्याचे सांगितले. त्यामुळे माझी जागा बदलली जात असल्याचे तो अडखळत म्हणाला. मला हे एकून धक्काच बसला. मात्र, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

दरम्यान, विमान कंपनीने याबाबत काहीही माहिती देण्यास निकार दिला. दोन लोकांनी नारंगी रंगाचे झब्बे परिधान केलेले होते, एवढीच माहिती दिली.

मेरी म्हणाली, धार्मिक श्रद्धेमुळे हे धर्मगुरू महिलेशी बोलू शकत नाहीत. ही कसली परंपरा? हे लोक म्हणे महिलेजवळ बसू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत. मी तिथे बसले असते तर काय दिव्यंाग झाले असते? समजा विमानातील सारेच क्रू मेंबर महिला असत्या तर यांनी काय केले असते? समजा धार्मिक परंपरा म्हणून कुणी महिलेशी बोलू शकत नसतील तर अशा लोकांनी विमानातून प्रवासच करायला नको. मेरीच्या या लैंगिक भेदभावाबाबच्या तक्रारीवर विमान कंपनीने म्हटले आहे की, याबाबत आम्ही चौकशी करू. आमच्यामुळे मेरीला त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला त्याबद्दल आम्ही माफी मागतो. प्रवाशांची सोय करणे यालाच आमचे प्राधान्य आहे. असा भेदभाव कंपनी कधीच करत नाही, करणार नाही.

महिलांचीच माफी मागा...
मेरी म्हणाली, विमान कंपनीवर खटला दाखल करण्याची माझी इच्छा नव्हती. मात्र, यासाठी कंपनीने या एअरलाइन्सच्या विमानांतून प्रवास करणाऱ्या सर्वच महिलांची माफी मागायला हवी. महिला सुरक्षेबाबतचे धोरणही बदलायला हवे.
बातम्या आणखी आहेत...