आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेस्टमध्ये 1.5 Kg कोकेन दडवून नेणाऱ्या महिलेला विमानतळावर अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमानतळावर पाओलोकडे चौकशी करताना पोलिस अधिकारी - Divya Marathi
विमानतळावर पाओलोकडे चौकशी करताना पोलिस अधिकारी
बोगोटा - ब्रेस्ट इम्प्लांट करुन त्यात दीड किलो कोकेन लपवून स्पेनला पळून जाण्याच्या बेतात असलेल्या महिलेला कोलंबिया पोलिसांनी बोगोटा येथील डोराडो विमानतळावर अटक केली आहे. ब्रेस्टमध्ये कोकोन दडवणाऱ्या 22 वर्षीय महिलेचे नाव पाओला डेयानिरो सॅबिलन असून ती उत्तर अमेरिकेतील हॉन्डूरस येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शुक्रवारी ही महिला स्पेनला जाण्याच्या तयारीत होती.
विमानतळावरील पोलिस अधिकारी कर्नल डिअॅगो रोसेरो म्हणाले, 'सिक्यूरिटी लाइनमध्येच पाओलावर संशय आला होता. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवत होती.' विमानतळ सुरक्षा अधिकाऱ्यांनी महिलेचा एक्स-रे काढल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. पाओलाने ब्रेस्टमध्ये पातळ कोकेन लपवले होते.
पोलिस तपासात तिने ब्रेस्टमध्ये इम्प्लांट केलेला पदार्थ अंमली पदार्थ असल्याचे कबूल केले. कोकेन घेऊन बर्सिलोनाला जाणार असल्याचेही तिने सांगितले. प्राथमिक तपासात तिने सांगितले, की कोलंबियामधील परेरा या शहरातील एका गुप्त क्लिनीकमध्ये ब्रेस्ट इम्प्लांट करण्यात आले. पाओलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिचे ब्रेस्ट इम्प्लांट हटवण्यात आले आहे. ब्रेस्टमध्ये कोकेन लपवल्यामुळे तिला संसर्ग झाला असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
याआधी 2013 मध्ये तबिथा लिह रिची नावाच्या महिलेला बोगोटा विमानतळावर दोन किलो कोकेनसह अटक करण्यात आली होती. रिचीने बनावट प्रेग्नेंसी सूट घालून अंमलीपदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. कोलंबियामध्ये दरवर्षी 300 टन कोकेनचे उत्पादन होते. कोलंबिया आता हळुहळु अंमली पदार्थ तस्करीचा अड्डा बनत चालला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित छायाचित्रे
बातम्या आणखी आहेत...