आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पनामा पेपर्स लीक्सच्या माध्यमातून भ्रष्टाचार उघड करणाऱ्या महिला पत्रकाराची हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वालेटा- पनामा पेपर्स लीक्सच्या माध्यमातून माल्टातील भ्रष्टाचार उघड करणाऱ्या महिला पत्रकार डॅफ्ने कॅरुआना गॅलिजिया यांची हत्या झाली. माल्टामध्ये सोमवारी  घरापासून काही अंतरावर बॉम्बस्फोटाद्वारे त्यांना लक्ष्य करण्यात आले. स्फोट एवढा भीषण होता की कारच्या चिंधड्या झाल्या. गॅलिजिया ५३ वर्षांच्या होत्या. गॅलिजिया यांनी भ्रष्टाचार उघड करणारा दस्तऐवज आपल्या ब्लॉगद्वारे जगासमोर आणला. 
 
मे २०१६ मध्ये पनामा पेपर उघडकीस आले होते. त्याच्या 3 महिन्यांपूर्वीच माल्टातील पत्रकार डॅफ्ने कॅरूआना गॅलिझिया यांनी पंतप्रधान जोसेफ मस्कट यांनीसुद्धा भ्रष्टाचार केल्याचा दावा केला होता. पंतप्रधानांच्या पत्नी चीफ ऑफ स्टाफ किथ शेंब्री हे पनामाच्या एका कंपनीचे मालक आहेत. बेकायदा व्यवहारासाठी या कंपनीचा वापर होतो, असे डॅफ्ने यांनी ब्लॉगमध्ये लिहिले होते. या खुलाशानंतर माल्टा सरकारला धक्का बसला. मस्कट यांना राजीनामा द्यावा लागला. नंतर पुन्हा निवडणुका झाल्या त्यात मस्कट पुन्हा विजयी झाले. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी डॅफ्टने यांना “वन-वुमेन विकिलीक्स’ उपाधी दिली होती. ५३ वर्षीय डॅफ्ने यांची कार मंगळवारी बॉम्बने उडवण्यात आली. डॅफ्ने या कोणत्याही माध्यम संस्थांशी निगडित नव्हत्या. ‘रनिंग कमेंट्री’ नावाने ब्लॉग लिहायच्या. माल्टाची लोकसंख्या ४.५ लाख असून 4 लाख लोक डॅफ्ने यांचा ब्लॉग वाचतात. मंगळवारीही त्यांनी ब्लॉग लिहिला होता. यात किथ शेंब्री यांच्याबद्दल लिहिले होते. २.३५ वाजता डॅफ्ने यांनी ब्लॉग अपडेट केला आणि कार घेऊन निघाल्या. त्यानंतर ३५ मिनिटांतच कारमध्ये बॉम्बस्फोट झाला. 

व्यवस्थापन अयशस्वी होते तेव्हा अखेरपर्यंत व्यक्ती पत्रकारच असते आणि सर्वात मरणाराही पत्रकारच 

डॅफ्नेचा मुलगा मॅथ्यू देखील पत्रकार आहे. त्यांनी सोशल मीडियावर भावना मांडली- ‘माझी आई कायदा आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्याच्या नेहमीच विरोधात उभी राहिली. म्हणूनच तिचा मृत्यू झाला. व्यवस्था अपयशी ठरते. तेव्हा हेच घडते. अशा परिस्थितीत अखेरपर्यंत लढणारी व्यक्ती पत्रकारच असते..आणि सर्वात आधी मारला जातो तोदेखील पत्रकारच असतो. पंतप्रधान जोसेफ मस्कट, किथ शेंबी पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही. तेच जबाबदार आहेत.’ 
 
पंतप्रधान मस्कट यांचे स्पष्टीकरण.. मीया हत्याकांडात सामील नाही.. 
हत्याकांडातमाझा हात नाही. खरे तर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे, असे माल्टाचे पंतप्रधान जोसेफ मस्कट यांनी म्हटलेे. 
 
इंटरनॅशनल मीडिया 
बीबीसी :
डॅफ्नेयांनी पुराव्यांच्या आधारे सरकारवर टीका केली. त्याचाच परिणाम म्हणून पंतप्रधानांना पद सोडून पुन्हा निवडणूक घ्यावी लागली. 
इंडिपेंडंट: मोठ्यापातळीवर राजकीय भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आल्यामुळे डॅफ्ने यांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आली. 
माल्टाटुडे : डॅफ्नेयांची मोठी क्षमता होती. त्यांचे विचार ऐकून कुणालाही प्रेरणा मिळे. हाच त्यांच्या पत्रकारितेतील यशाचा मंत्र होता. 
सीएनएन: माल्टाच्याराजकारणातील भ्रष्टाचाराला चव्हाट्यावर आणण्याच्या कामात पहिल्यांदा डॅफ्ने यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी युरोपवर प्रभाव टाकला. 
बातम्या आणखी आहेत...