आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

71 वर्षांपूर्वी दुसऱ्या महायुद्ध समाप्तीनंतर सुखाचे प्रतीक झालेल्या महिलेचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
१५ वर्षांनंतर महिलेला, ३५ वर्षांनंतर युवकाला हे छायाचित्र आपले असल्याचे समजले - Divya Marathi
१५ वर्षांनंतर महिलेला, ३५ वर्षांनंतर युवकाला हे छायाचित्र आपले असल्याचे समजले
न्यूयॉर्क - ७१ वर्षांपूर्वी १९४५ मध्ये दुसऱ्या महायुद्ध समाप्तीनंतर हे छायाचित्र जगभरात प्रचंड गाजले. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर नौसैनिक एका नर्सचे चुंबन घेत असतानाचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला. जपानवर अमेरिकेच्या विजयाचे प्रतीक म्हणून हे छायाचित्र संस्मरणीय ठरले. यात परचारिका ग्रेटा फ्रिडमन असून तिने आता जगाचा निरोप घेतलाय. मृत्युसमयी तिचे वय ९२ वर्षांचे होते. न्यूमोनियाने तिचा मृत्यू झाला.

जर्मन-अमेरिकन छायाचित्रकार अल्फ्रेड इसेन्सटाइडने १४ ऑगस्ट १९४५ मध्ये हे छायाचित्र घेतले. या वेळी युद्ध समाप्तीची घोषणा झाली होती. जॉर्ज मेंडोसा नामक युवकाने आनंदाच्या भरात फ्रेडाचे चुंबन घेतले. विशेष म्हणजे आपले छायाचित्र इतके प्रसिद्ध आहे याची या दोघांनाही कल्पना नव्हती.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, छायाचित्राबाबत काय म्‍हणाली होती फ्रिडमन
बातम्या आणखी आहेत...