आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 वर्षानंतर आई त्या तरुणीला भेटली, जिला मुलाचे हृदय केले होते दान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेनिफर लँटिनीच्या हृदयाचे स्पंदन ऐकताना मॅ‍थ्‍यूची आई विकी ब्रेनन. - Divya Marathi
जेनिफर लँटिनीच्या हृदयाचे स्पंदन ऐकताना मॅ‍थ्‍यूची आई विकी ब्रेनन.
न्यूयॉर्क - पूर्वीच्या 19 वर्षे जूने दोन किस्से. ती घडली 1996 मध्‍ये. जुलै महिन्यात अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यात 14 वर्षांचा मॅथ्‍यू आपल्या मित्रांबरोबर खेळत होता. काही मित्रांकडे बंदूकही होती. खेळा-खेळात अचानक गोळीचा आवाज आला. ती मॅथ्‍यूला लागते. यात त्याचा मृत्यू होतो.

दुसरीकडे न्यूयॉर्कमध्‍ये 13 वर्षांची एक मुलगी जेनिफर सॉफ्टबॉल-बास्केबॉलसारख्‍या खेळांची चाहती होती. एप्रिल महिन्यात ती खेळत होती आणि अचानक बेशुध्‍द झाली. पोटात तीव्र वेदना होत होत्या. आई-वडिलांना समजल्यानंतर त्यांनी जेनिफरला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी अनेक चाचण्‍या केल्या. परंतु पोट दुखण्‍याचे कारण समजले नाही. शेवटी चार महिन्यानंतर जुलैमध्‍ये डॉक्टरांनी अपेंडिक्स शंकेमुळे मुलीची सर्जरी करण्‍याचा निर्णय घेतला.
मात्र सर्जरी चालू असताना मुलीला हृदयविकाराचा झटका बसला. ती वाचेल,की नाही यामुळे डॉक्टर घाबरले. याचे माहिती कुटूंबाला देण्‍यात आली. त्यांनी मुलीच्या अंत्यविधीची तयारी सुरु केली. परंतु अचानक मुलीची स्थिती सुधारताना दिसली. ताबडतोब तिला दुस-या दवाखान्यात दाखल केले गेले. तिथे कळले, की जेनिफरच्या हृदयात दोष आहे. तिला हृदयाचे प्रत्यारोपण करावे लागणार. ही घटना होती 5 जुलै रोजीची. डॉक्टरांना कळले, की फ्लोरिडाच्या मॅथ्‍यूची आई मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव दान केले आहे. डॉक्टरांनी तात्काळ त्या मुलाचे हृदय मागावले. आणि 6 जुलै रोजी मॅथ्‍यूचे हृदय जेन‍िफरच्या शरीरात क्रियाशील झाले.

आता या वर्षाची घडामोड. मॅथ्‍यूची आई विकी ब्रेनन 14 फेब्रूवारीला पहिल्यांदाच जेन‍िफरला भेटली. तिच्या मुलाचे हृदयाचे प्रत्यारोपन तिला करण्‍यात आले होते. फेस‍बुकच्या माध्‍यमातून जेनिफरने मॅ‍थ्‍यूच्या आईचा शोध घेऊन फ्लोरिडात पोहोचली. सहा जुलै रोजी ब्रेननच्या मुलाच्या हृदयाचे 33 वे वाढदिवस आहे.
मला तिच्या हृदयात माझ्या मुलाच्या हृदयाची स्पंदन
जेनिफरला भेटून असे वाटले, की आपण आपल्याच मुलाला भेटतो. विमानतळावर ती भेटताच मी तिची गळा भेट घेतली. मी कान लावून माझ्या मुलाच्या हृदयाची स्पंदने ऐकत होते. माझा मुलगा हा खूप शूर होता. जगाचा निरोप घेऊन एकाला ज‍ीवदान देऊन गेला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...