आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS साठी तिने केला थेट मुलांचा त्याग, ऑस्ट्रेलियन महिला सिरियात जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - २६ वर्षीय ऑस्ट्रेलियन महिला जास्मिना मिलव्हानोव्ह हिने सिरियाला जाण्यासाठी आपल्या दोन छोट्या मुलांचाही त्याग केल्याचे वृत्त सिडने मॉर्निंग हेरॉल्ड वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. सिरियात जाऊन इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनात सहभागी होण्याची तिची इच्छा आहे.

आपण नवी कार खरेदी करायला जात आहोत, असे तिने मुलांच्या आयाला सांगितले. त्यानंतर ती सिडनेतील आपल्या घरी परतलीच नाही. जास्मिना जिहादी वधू-वर सूचक मंडळाच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तिने आपल्या ऑस्ट्रेलियन पतीशी घटस्फोट घेतला होता. आपण सिरियात असल्याचेही तिने त्याला सांगितले होते.

न्यू साऊथ वेल्स पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दहशतवादविरोधी पथकाच्या सहकार्याने तपास सुरू असून कोणतेही भाष्य करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. जास्मिना मिलव्हानोव्ह हिला ५ व ७ वर्षांची दोन मुले आहेत. आपल्याला ही बातमी वाचून धक्का बसल्याचे तिच्या पतीने म्हटले आहे. ती मुलांना सोडून जाईल असे वाटलेच नव्हते, असे त्याने म्हटले. मिलव्हानोव्ह फेसबुकमधून आयएसच्या संपर्कात आल्याचे प्राथमिक तपासातून दिसून आले. जेहरा दुमान नामक महिला सोशल मीडियाचतून महिलांना आयएसकडे आकर्षित करत असल्याचे या प्रकरणात दिसून आले. सध्या देशातील १५० नागरिक आयएसच्या संपर्कात असल्याचे पंतप्रधान टॉनी एबॉट यांनी सांगितले.