आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानात सुसाइड नोट, महिला हादरली, सर्वांनाच घेऊन आत्महत्येचा प्रयत्न उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को - एका माथेफिरू प्रवाशामुळे शेजारी बसलेली महिला प्रवासी चांगली हादरली. एक व्यक्ती सुसाइड नोट लिहित होता. स्वत: सोबतच विमानातील सर्व प्रवाशांना घेऊन मृत्यूला कवटाळणार, असे त्याने चिठ्ठीत लिहिले होते. हे पाहून महिलेला घामच फुटला. तिने कशीबशी हिंमत करून विमानातील कर्मचाऱ्याकडे तक्रार केली.

वैमानिकाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि त्याने तांत्रिक बिघाड असल्याकारणाने विमानाला सॅन फ्रान्सिस्को विमानतळावर उतरवले. त्याचवेळी पोलिसांनी विमानाला घेराव घातला आणि त्या माथेफिरूला ताब्यात घेतले. श्वानपथक, बाँबशोधक पथकाकडून विमानाची कसून तपासणी झाली. त्यात पोलिसांना कोणतेही स्फोटक किंवा शस्त्र आढळून आले नाही. आता ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलिस आणि व्हर्जिन एअरलाइन्सने मात्र या व्यक्तीचे नाव स्पष्ट केलेले नाही. विमानात १०८ प्रवासी होते. या काळात भीती निर्माण झाल्याने अनेक प्रवाशांनी हा प्रवास मध्येच सोडला.
चिट्ठीवर नजर पडताच मुलांचे चेहरे डोळ्यासमोर
सुसाइड नोटविषयी विक्की रिफी या महिनलेने कर्मचाऱ्यांना माहिती दिली. माथेफिरूच्या डाव्या बाजूला असलेल्या आसनावर ही महिला बसलेली होती. ही व्यक्ती खूप तणफणत काहीतरी लिहीत होती. त्याचा इरादा काही ठिक नसल्याचे मला आेळखू आले होते. तो व्यक्ती अतिशय सणकी दिसत होता. अचानक माझी नजर त्याच्या हिरव्या रंगाच्या नोटपॅडवर पडली. मी स्वत:ला अतिशय वेदनादायी मृत्यू देणार आहे. विमानाला उद्ध्वस्त करून स्वत: सोबत इतरांनाही घेऊन मरणार आहे, असे त्याने लिहिले होते. हे पाहून मी घाबरले आणि माझ्या डोळ्यासमोर माझी मुले दिसू लागली. एवढेच नव्हे तर मी आतून हादरले. मला घाम फुटला होता. थरथरत होते. मग हळूच कॉल बटण दाबून विमान कर्मचाऱ्याला बाजूला बोलावून घेतले.
बातम्या आणखी आहेत...