आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भररस्त्यावर गुंडाच्या छातीवर बसली तरुणी, स्वतःचे कपडे काढून केले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेने सांगितल्याप्रमाणे, तो तिच्या शरीराला वारंवार हात लावत होता. - Divya Marathi
महिलेने सांगितल्याप्रमाणे, तो तिच्या शरीराला वारंवार हात लावत होता.
इंटरनॅशनल डेस्क - ब्राझीलच्या रिबेराओ प्रेतो शहरात भर रस्त्यावर अजब प्रकार घडला. यात एका तरुणीने कथितरीत्या छेड काढणाऱ्या एका पुरुषाला रस्त्यावरच पाडले. यानंतर त्याच्या छातीवर बसून जोर-जोरात ओरडत होती. एवढेच नव्हे, तर कपडे काढल्यानंतर तिने जे कृत्य केले ते पाहून सगळ्यांना धक्का बसला. हा सर्व प्रकार बाजारातील लोक आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करत होते. पाहता-पाहता बघ्यांची गर्दी झाली. ती महिला एक सेल्सगर्ल होती. तिने संबंधित पुरुषावर आपल्याला गर्दीचा गैरफायदा घेत नको त्या ठिकाणी स्पर्श करणे आणि छेड काढण्याचा आरोप लावला. ती व्यक्ती आपल्याला खूप वेळापासून टच करत होती. सहन न झाल्यानंतरच आपण हे पाऊल उचलले असे तिने सांगितले आहे.

काय म्हणाला आरोपी...
- महिलेने सांगितल्याप्रमाणे, ती एक सेल्सगर्ल आहे. ही व्यक्ती वारंवार तिच्या अंगाला हात लावत होता. आपल्या मागे आणि ब्रेस्टसह विविध ठिकाणी पुन्हा-पुन्हा स्पर्श करत होता. त्यामुळेच, तिने त्या व्यक्तीच्या छातीवर बसून आपले, "हेच पाहत होतास ना, हेच टच करत होतास ना" असे म्हणत चेहऱ्यावर अंग घासले.
- संबंधित पुरुषाची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, या घटनेनंतर त्याने आपल्याला निर्दोष म्हटले आहे. आपल्या पत्नीसोबत शॉपिंगला आला असतानाच अचानक या महिलेने आपल्यावर हल्ला केला आणि अंगावर चढली. आपण काहीही वाइट केलेले नाही असा दावा त्याने केला आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर फोटोजमध्ये पाहा संपूर्ण प्रकार आणि VIRAL व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...