आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सुटकेसमध्ये मुलाला लपवून निघाली होती स्पेनला, स्कॅनरमुळे गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅड्रिड - स्पेन पोलिसांनी मोरक्को येथे एका युवतीला आठ वर्षांच्या मुलाची तस्करी करण्याच्या आरोपात अटक केली आहे. सिव्हिल गार्ड पोलिसांच्या माहितीनूसार, 19 वर्षीय युवती एका आयव्हेरियन मुलाला सुटकेसमध्ये लपवून स्पेनला घेऊन जात होती.
मोरक्को ते क्यूटाच्या सीमेवर पोलिसांना युवतीच्या संशयास्पद हलचालीवरुन संशय आला. कस्टम अधिकाऱ्यांनी युवतीला अडवले आणि तिच्याकडे ड्रग्स आहे का, याची तपासणी करु लागले. तिच्या सुटकेसला स्कॅनरमध्ये टाकल्यानंतर त्यात मानवी आकृती स्पष्ट दिसली.
अधिकाऱ्यांनी तातडीने सुटकेस उघडली तर, त्यात एक आठवर्षांचा जिवंत मुलगा होता. तो आयव्हरी कोस्ट येथील रहिवाशी आहे. सध्या पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतले असून पोलिसांनी आयव्हरी कोस्ट येथे एका व्यक्तीला अटक केली आहे. तो मुलाचा पिता असल्याचे सांगितले गेले आहे. स्पेनमध्ये अफ्रिकेच्या शरणार्थींची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे स्पेनसमोर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, घटनेशी संबंधीत फोटो
बातम्या आणखी आहेत...