आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Revolution: 25 वर्षीय तरुणीने जेट ब्लॅक गाऊन घालून थाटले लग्न, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)- मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी महाराष्ट्रात मोठे रणकंदन माजले आहे. या मंदिराचे भाविक आणि सुधारक यांच्यात यावरुन संघर्षाचे वातावरण तयार झाले आहे. असेच काहीसे बदल विदेशातही दिसून येत आहे. 25 वर्षीय सोफिया कॅशिया हिने काळे कपडे घालून लग्न थाटले. लग्नात सहसा पांढरे किंवा आकर्षक रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे. पण या परंपरेला फाटा देऊन सोफियाने काळ्या कपड्यात लग्न केले. मला वाटले म्हणून मी असे केले, असे साधे सरळ उत्तर तिने यासंदर्भात दिले आहे.

सोफिया कॅशियाने लग्नात जेट ब्लॅक गाऊन परिधान केला होता. या पेहरावात ती भलतीच सुंदर दिसत होती. केवळ सोफियाच नव्हे तर तिच्या सर्व मैत्रिणींनी यावेळी काळ्या रंगाचे कपडे घातले होते. लांब स्लिव्ह, हाय नेक आणि काळ्या रंगाचे कपडे घालण्याचे त्यांनी आधीच पक्के केले होते. सिग्नॉर माऊंट काऊश्चर येथील अॅंथनी मॉंटेसॅनो यांनी सोफियासाठी खास हा ड्रेस डिझाईन केला होता.
सोफियाला एक लहान मुलगीही आहे. दी यंग ममी नावाचा ब्लॉग ती लिहिते. यासंदर्भात तिने सांगितले, की मला काळा रंग आवडतो. मला हा सुट होतो. हा बोल्ड आणि स्ट्रायकिंग कलर आहे. यात माझी स्लाईल आहे. त्यामुळेच मी हा धाडसी निर्णय घेतला.
सोफियाचा पती जेअर्स कॅशिया यानेही परंपरा मोडत ब्लॅक आणि मरुन कलरचे कॉम्बिनेशन असलेला कोट घातला होता. त्यावर त्याने काळ्याच रंगाची पॅंट पसंत केली होती.
सोफिया सांगते, की मला काही पारंपरिक करायचे नव्हते. प्रत्येक जण लग्न करतो. प्रत्येकाने सारखेच का करावे. त्यात बदल करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. यासाठी काही रुलबुक नाही. लग्नाच्या दिवशी काळे कपडे घातले म्हणून माझी ओळख व्हावी म्हणून मी हे केले नाही. मला वाटले म्हणून मी असे केले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, लग्नाच्या दिवशी ब्लॅक ड्रेस घातलेल्या सोफिया कॅशियाचे आकर्षक फोटोशुट....
बातम्या आणखी आहेत...