आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्कार्फला हिजाब समजून महिलेवर केला हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन फ्रान्सिस्को - अमेरिकेत एका भारतवंशीय महिलेने स्कार्फ बांधला होता. मात्र त्याला हिजाब समजून वंशद्वेषी व्यक्तीने महिलेच्या कारची तोडफोड केली.
कॅलिफोर्नियाच्या सॅन फ्रान्सिस्को येथे ४१ वर्षीय निक्की पंचोली फिरण्यासाठी बाहेर पडल्या. त्या आपल्या कार जवळ येताच त्यांना खिडकीची काच फुटल्याचे दिसले. त्यांची पर्सही गायब होती. कारमध्ये चिठ्ठी ठेवलेली होती. यात हिजाबविषयी द्वेष भावनेने लिहिलेले होते. पंचोली यांनी आपण मुस्लिम नसल्याचे सांगितले. त्यांना लूपस नामक आजार असल्याने त्यांचे केस गळून गेले आहेत. उन्हापासून डोक्याचा बचाव करण्यासाठी त्या स्कार्फ बांधतात.

न्यूयॉर्कचे स्थानिक लोकप्रतिनिधी राज सालवान यांनी म्हटले की, ‘ देशांतील वातावरण गढूळ झाले असून आपल्या अनेक मित्रांना व त्यांच्या कुटुंबीयांना असुरक्षित वाटत आहे. मात्र सर्वांना सन्मानाने जगता यावे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.’ पोलिस या प्रकरणी तपास करत आहे. या आधीही अमेरिकेत हिजाब घालणाऱ्या महिलांशी भेदभावाची वर्तणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हिजाब घातलेल्या एका महिलेला विमानातून उतरवल्याची घटना घडली होती.
बातम्या आणखी आहेत...