आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्यूनिशिया हल्ला: अंधाधुंदी गोळीबारात चष्‍म्याने वाचवला महिलेचा जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपली पत्नी ख्रिस्तियन केलहनला समजून सांगताना टोनी केलहन(डावीकडून) - Divya Marathi
आपली पत्नी ख्रिस्तियन केलहनला समजून सांगताना टोनी केलहन(डावीकडून)
लंडन - ट्यूनीशियातील दहशतवादी हल्ल्यात 60 वर्षांची ख्रिस्तियन केलहन खूप नशीबवान आहे. दहशतवादी सैफुद्दीन रेजगुई हॉटेलसमोर अंधाधुंद गोळीबार करित होते. तेव्हा केलहन काही अंतरावर होती. ती गर्दीत अडकली आणि आपले पती टोनी यांची ताटातूट झाली. बंदुकीची एक गोळी तिच्याबाजूने आली. ती सरळ बॅगमध्‍ये ठेवलेल्या चष्‍म्याच्या कव्हरला लागून गोळी ख्रिस्तियनाच्या मांडीत शिरली. चष्‍म्याला लागल्याने गोळीची गती कमी झाली. यामुळे तिला गंभीर जखम झाली नाही. या गोळीबारात ख्रिस्तियनाच्या पतीच्याही पायाला गोळी लागली आहे. सध्‍या दोघे धोक्याच्या बाहेर आहेत.

नशीबवान आहे, म्हणून बॅगबरोबर होती
मला गोळी लागली. माझा डावा पाय वाकला आणि मी खाली पडले. मी भाग्यवान आहे, की माझ्याबरोबर बॅग होते. गोळी जर सरळ आली असते, तर माझ्या पोटात शिरली असते. चष्‍म्याच्या कव्हरला ती लागल्याने दिशा आणि गती बदलली. जीव वाचला.
- ख्रिस्तियना केलहन, गोळीबारात बचावलेली महिला.
क्षणभर वाटले, की मी तिला गमावले
गोळीबार दरम्यान आम्ही सर्व हॉटेलच्या बाजूने धावलो. मात्र माझ्या उजव्या पायाला गोळी लागली. आम्ही रुममध्‍ये पोहोचलो. मात्र वाटले, की मी ख्रिस्तियनाला गमावले. पण तिला पाह‍ि‍ल्यानंतर जीवात जीव आला.
टोनी केलहन, निवृत्त पोलिस अधिकारी

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...