आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीस : चेंगराचेंगरीत महिला आणि तिच्या बाळाला वाचवण्यासाठी उभी केली मानवी भिंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रीकच्या कोस आयलंडमध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेसदरम्यान गर्दीमध्ये बाळासह अडकलेल्या एका महिलेला चारही बाजुने घेराव घालून तिचा असा बचाव केला. - Divya Marathi
ग्रीकच्या कोस आयलंडमध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेसदरम्यान गर्दीमध्ये बाळासह अडकलेल्या एका महिलेला चारही बाजुने घेराव घालून तिचा असा बचाव केला.
अॅथेन्स - डिफॉल्टर ग्रीस आता सिरीयामध्ये येणाऱ्या प्रवासी नागरिकांच्या समस्येने त्रस्त झाला आहे. भूमध्यसागरमार्गे लोक याठिकाणी पोहोचत आहेत. सोमवारी कोस आयलँडवर एका फुटबॉल ग्राऊंडवर नोंदणीसाठी सुमारे 1500 जण जमले होते. याठिकाणी जमलेले लोक घोषणाबाजीही करत होते. यादरम्यान धक्का-बुक्की सुरू झाली. परिस्थिती बिघडत असल्याने पोलिसांनी लाठीहल्ला सुरू केला. तसेच फोम स्प्रे सुरू केला. त्यामुळे चेंगराचेंगरी सुरू झाली. त्यात एक महिला आणि तिचे लहान बाळ फसले. त्यांना वाचवण्यासाठी सिरियाच्या तरुणांनी तिच्या सर्व बाजुंनी एक मानवी भिंत तयार करत, त्या दोघांना वाचवले.

700 पटीने वाढली घुसखोरी
गेल्या वर्षापासून अंतर्गत कलहामुळे स्थिती बिघडलेल्या सिरियामधून सुमारे 32,000 लोक ग्रीसला पोहोचले आहेत. यंदा हा आकडा 1.56 लाखावर गेला आङे. सुरुवातीच्या सात महिन्यांमध्ये ही घुसखोरी गेल्यावर्षीच्या तुलनेत 700 पट वाढली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या गोंधळाचे काही फोटो...