आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women And Men Whipped For Sex Before Marriage In Indonesia

PHOTOS: लग्नापूर्वी सेक्स केल्याने तरुणीच्या पाठीवर सपासप ओढले चाबकाचे फटके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंदा अकेह (इंडोनेशिया)- गुडघ्यांवर बसलेल्या या तरुणीवर शिक्षेची अंमलबजावणी केली जात आहे. लग्नापूर्वी एका पुरुषासोबत सेक्स केल्याने या तरुणीला सर्वांसमोर चाबकाचे सपासप फटके मारण्यात आले. शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर मशिदीबाहेर सेक्स आणि गॅम्बलिंगच्या आरोपातील तीन तरुणी आणि चौदा पुरुषांना चाबकाचे फटके मारण्यात आले.
इंडोनेशियात मुस्लिम समाज बहुसंख्य आहे. शरीया कायदा लागू करणारे येथील बंदा अकेह हे एकमेव शहर आहे. त्यामुळे एखाद्या अपराधाची शिक्षा म्हणून सर्वांसमोर चाबकाचे फटके मारणे अगदी सर्वसामान्य बाब आहे. परंतु, तरुणीला चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बहुधा कमीच सुनावली जाते.
यापूर्वी जून महिन्यात अशा प्रकारे सर्वांसमोर चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा येथे बजावण्यात आली होती. लग्न न झालेल्या मुली आणि मुले सोबत वेळ घालवताना सापडल्याने तीन मुले आणि मुलींना चाबकाचे फटके मारण्यात आले होते. बंदा अकेहमध्ये 2001 पासून सेक्स, गॅम्बलिंग आणि दारु पिणे या गुन्ह्यांमध्ये चाबकाचे फटके मारण्याला परवानगी देण्यात आली आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, महिला आणि पुरुषांना कसे मारण्यात आले चाबकाचे फटके....