आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या देशात बिन्धास्त बाइक चालवतात मुस्लिम महिला, फिरतात टोळीने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - मुस्लिम बहुल देश मोरोक्कोमध्ये महिलांसाठी व्यक्ती स्वातंत्र्य नाही असा जगभरात समज आहे. ब्रिटिश फोटोग्राफर हसन हजाज हाच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करताना मोरोक्कोची एक वेगळीच प्रतिमा आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहे. त्यापैकी काही फोटोजमध्ये मोरोक्कोच्या तरुणी बिन्धास्तपणे गँग करून बाइकवर फिरताना दाखवण्यात आले आहे. हजाज यांनी नुकतेच न्युयॉर्कमध्ये आपल्या फोटोग्राफीचे कलेक्शन प्रदर्शित केले होते. आता हजाज आपला हाच कलेक्शन लंडनच्या म्युजिअममध्ये लावण्याची तयारी करत आहेत. 
 
 
- पहिल्यांदा मोरोक्कोला जाणारे बहुतांश पर्यटक या देशाला सीरिया किंवा इराकसारखे समजतात. प्रत्यक्षात, येथील महिलांना स्वातंत्र्य आहे. दिलखुलासपणे आपल्या मर्जीने आपले आयुष्य जगतात. 
- हसन यांनी नुकतेच सीएनएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये फोटोज काढताना आलेले अनुभव व्यक्त केले. 
- मोरक्कोच्या महिलांमध्ये एक ऊर्जा आहे. जी बाइक चालवताना दिसून येते. मरक्केश शहरातील महिला एक टोळी बनवून बाइकवर फिरतात. ह्या टोळ्या गुंडगिरी करण्यासाठी मुळीच नाहीत. यातील सर्वच महिला सुशिक्षित आहेत.
- महिलांनी बाइक चालवणे हे येथील संस्कृतीचा एक भाग आहे. बहुतांश महिला बाइक चालवताना दुपट्टा आवश्य वापरतात. स्थानिक भाषेत याला 'जेलाबाह' असेही म्हटले जाते. त्या काय घालून आणि कशाप्रकारचे कपडे परिधान करून बाइक चालवतात हे त्यांच्या निवडीचा भाग आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मोरोक्कोच्या महिला बाइक गँगचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...