आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईराणी महिलांना आवडत नाही इस्लामी ड्रेसकोड, फोटोग्राफरने दाखवली त्यांची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1979 मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमध्ये लागू करण्यात आलेल्या पारंपरिक ड्रेसकोडचे कडक पालन केले जाते. पण येथील श्रीमंत कुटुंबांतील महिलांना ते आवडत नसल्याचे समोर येत आहे. फ्रेंच फोटोग्राफर एरिक लॅफॉर्ग यांनी असे काही फोटो क्लिक केले आहेत, ज्यावरून इराणी महिलांना हा ड्रेसकोड फॉलो करण्याची इच्छा नसल्याचे दिसून येते. लॅफॉर्ग यांच्यामते या महिलांना इस्लामिक निर्बंध झुगारून स्वतःच्या मर्जीने जगण्याची इच्छा आहे.

क्रांतीपूर्वी मॉडर्न होता इराण
- 52 वर्षांचे लॅफॉर्ग म्हणाले, मी इराणच्या शाडोर्स आणि त्याच्या कायद्याबाबतच बरेच काही ऐकले होते.
- मला स्वतःला ते सर्व पाहायचे होते. तसेच ते लोक या कडक कायद्यातही कसे वावरतात हे मला जाणून घ्यायचे होते.
- इराणी महिला सेल्फी आणि इन्स्टाग्राम पोस्टबाबत खूप क्रेझी आहेत. त्यामुळेच त्यांचे फोटो समोर येत आहेत.
- त्यांची ही सवय कधी कधी त्यांनी अडचणीतही आणते.
- महिलांना रिलिजियस पोलिसांमुळे त्रास होत असल्याचे मी अनेकदा पाहिले आहे.

एकेकाळी फॉरवर्ड होता इराण
- 1979 पूर्वीपर्यंत इराण संस्कृतीचा विचार करता खूप विकसनशील देश होता. त्यावेळी या देशाला फॅशन फॉरवर्डही मानले जात होते.
- त्या काळात जाहिरातींमध्येही इराणी महिला कमी कपडयांमध्ये दाखवल्या जात होत्या.
- पण इस्लामिक क्रांतीनंतर येथील कायदे कडक करण्यात आले.
- महिलांसाठी कडक ड्रेसकोडनुसार हिजाब परिधान करणे गरजेचे बनले.
- त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणीही डोक्यापासून मानेपर्यंत आणि हाताच्या बाह्या झाकलेल्या असणे गरजेचे आहे. हा कायदा विदेशी पर्यटकांसाठीदेखिल आहे.
- मात्र आता इराणमध्ये काही हायप्रोफाइल महिला या कायद्याला विरोध करत आहेत.

अभिनेत्रीच्या फोटोमुळे उडाली होती खळबळ
- गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये अभिनेत्री सदफ तेहरियन हिने इन्स्टाग्रामवर हिजाब नसलेले काही फोटो शेयर केले होते.
- देशात हिजाब परिधान करण्यासाठी केल्या जाणाऱ्या जबरदस्तीचा ती विरोध करत होती.
- मात्र तिच्या फोटोने एकच खळबळ उडाली होती. इराणच्या कल्चरल मिनिस्ट्रीने सदफचे वर्क लायसन्स रद्द केले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...