आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशात असे काय घडले, तरूण महिलांमध्ये सुरू झाला नसबंदीचा सपाटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हेनेझुएलामध्ये तरूण महिला करत आहेत नसबंदी ऑपरेशन. - Divya Marathi
व्हेनेझुएलामध्ये तरूण महिला करत आहेत नसबंदी ऑपरेशन.
कराकस- व्हेनेझुएला सध्या प्रचंड मोठ्या आर्थीक संकटातून मार्ग काढत आहे. खाण्यापासून तर वैद्यकीय सेवेपर्यंत साऱ्याच सेवेसाठी लोक त्रस्त आहेत. एवढेच नाही तर, दुकानांमध्ये कॉन्डोम आणि बर्थ कंट्रोल पिल्स देखील उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत येथील तरुणांना मुलांचे संगोपन आणि बाळंतपणाचा खर्च उचलणेही मुश्किल झाले आहे. परिणामी त्यांच्यावर अक्षरशः नसबंदी ऑपरेशन करायची वेळ आली आहे.
दुसऱ्या मुलाची होती इच्छा पण करावे लागले ऑपरेशन...
- कराकस म्यूनिसिपल हेल्थ सेंटरमध्ये ऑपरेशन करणाऱ्या 28 वर्षीय मिलाग्रॉस मार्टिनेजने सांगितल्यानुसार, अशा परिस्थितीत मुलगा झाल्यास फार कठीन परिस्थितीला सामोरे जावे लागेल.
- मार्टिनेज कराकसच्या बाहेर राहते आणि तिची दुसऱ्या मुलाला जन्म देण्याची इच्छा होती.
- परिस्थिती अशी आहे की, येथे बर्थ कंट्रोल पिल्स मिळत नसल्याने तिने ऑपरेशन करायचा निर्णय घेतला.
- मार्टिनेज सांगते की, तिचा संपूर्ण दिवसच दोन घासांसाठी सुपरमार्केट बाहेर लांबच्या लांब लाईनमध्ये उभे राहण्यात जातो.
- नसबंदीच्या बाबतीत आधी तिच्या मनात भीती होती. मात्र अशा परिस्थितीत मुलाला जन्म देण्यापेक्षा तिला हेच योग्य वाटले.
ऑपरेशनसाठी लागले आहेत हेल्थ कॅम्प
- देशाची आर्थीक परिस्थिती बिघडल्यामुळे येथे नसबंदी सारखे ऑपरेशन कराण्याची वेळ आली आहे. मात्र आता पर्यंत किती लोकांनी नसबंदी केली हे अद्याप कळू शकलेले नाही.
- डॉक्टर्स आणि नॅशनल फॅमिली ऑर्गेनायझेशनच्या हेल्थ वर्कर्सने सांगितल्यानुसार, मागिल काही महिन्यांपासून नसबंदीची मागणी वाढत होती.
- कराकसच्या हेल्थ सेंटरमध्ये खास नसबंदीसाठी कॅम्प लावण्यात आला. येथे पोहोचण्यासाठी बसेसचीही व्यवस्था करण्यात आली होती.
- महिलांसाठी लोकल हेल्थ प्रोग्राम सुरू आहेत. कराकस येथे साधारणपणे 40 ठिकाणी ऑपरेशन प्रोग्राम्स सुरू आहेत.
- प्रोग्रॅम डायरेक्टर डेलियानाने दिलेल्या माहिती नुसार, ऑपरेशनसाठी 500 महिला आद्यापही वेटिंग लिस्टमध्ये आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित Photos
बातम्या आणखी आहेत...