आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Atlas of Beauty : निखळ सौंदर्य टिपण्यासाठी जगभर फिरतेय ही फोटोग्राफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निखळ सौंदर्याची व्याख्या ही प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून वेगळी असू शकते. जगभरात असे सौंदर्य विखुरलेले आहे. त्यात महिलांचे सौंदर्य हे जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत असते. अशाच निखळ सौंदर्याच्या शोधामध्ये रोमानियाची एक फोटग्राफर सध्या जगभ्रमंती करत आहे.

रोमानियाच्या फोटोग्राफर मिहेला नोरॉक या त्यांच्या दैनंदिन कामाला चांगल्याच कंटाळल्या होत्या. त्यामुळे त्यांनी ते काम सोडले आणि जगभ्रमंती करण्याचा निर्णय घेतला. जगभर फिरून त्याठिकाणचे सौंदर्य कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा निर्धार त्यांनी केला. आपल्या या प्रोजेक्टला मिहेला यांनी द अॅटलस ऑफ ब्युटी असे नाव दिले आहे. प्रत्येक देशात जाऊन त्याठिकाणच्या महिलांच पोट्रेटस काढून मिहेला त्यामाध्यमातून त्या ठिकाणच्या महिलांचे सौंदर्य जगासमोर आणत आहेत. आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक वातावरणात महिलांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते असे मिहेला यांचे स्पष्ट मत आहे. त्यामुळेच त्याठिकाणी जाऊन मिहेला या महिलांचे फोटो टिपत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मिहेला यांनी टिपलेले काही महिलांचे पोट्रेट्स...