आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनी सोशल मीडियावर सुरू केला पाय फाकवून बसण्याचा Trend, हे आहे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - प्रचार, प्रसार आणि आंदोलनासह विविध गोष्टींसाठी अत्यंत महत्वाचे प्लॅटफॉर्म बनलेल्या सोशल मीडियावर नेहमीच कॅम्पेन चालवले जातात. तशाच प्रकारचा एक कॅम्पेन काही तरुणींनी सुरू केला आहे. यात त्या रेल्वे, बस, विमान आणि इतर सार्वजनिक ठिकाणी तसेच आपल्या घरात सुद्धा पाय फाकवून बसत फोटो काढत आहेत. तेच फोटोज असंख्य महिलांकडून इंस्टाग्रामवर जगभरात पोस्ट केले जात आहेत.


मुलींना लहानपणापासून सार्वजनिक ठिकाणी कसे बसावे आणि कसे बसू नये अशा प्रकारचे धडे दिले जातात. त्यांना आपले पाय नेहमी जोडून किंवा एकावर एक ठेवून बसण्यास सांगितले जाते. मात्र, आजकालच्या तरुणींना ते पटत नाही. त्यांनी इंस्टाग्रामवर #womenspreading या हॅशटॅगसह ट्रेन्ड सुरू केला आहे. आम्ही कसे बसावे आणि कसे नाही हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. ते आम्ही आमचेच ठरवू असा सल्ला त्या जगाला देत आहेत.

 

त्यातही अनेकींनी आपल्याला पुरुष सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी पुरेसी जागा देत नाहीत. पाय फाकवून ते जागा घेरतात. त्यामुळे, महिलांना पाय अगदी जोडून अडचणीत बसावे लागते अशी तक्रार केली. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, इंस्टाग्रामवर शेअर केले जाणारे असेच आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...