आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

36 तासांनंतर ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर, \'सोडली होती जगण्याची आशा\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - भूकंपानंतर ढिगाऱ्यात अडकलेल्यांना बाहेर काढणारे मदत पथकाचे जवान. - Divya Marathi
फोटो - भूकंपानंतर ढिगाऱ्यात अडकलेल्यांना बाहेर काढणारे मदत पथकाचे जवान.
काठमांडूहून राजेश कुमार ओझा
नेपाळच्या भुकंपातील मृतांचा आकडा 4500 च्या पुढे सरकला आहे. हा आकडा 15 हजारांपेक्षाही जास्त असू शकतो असा अंदाज आहे. पण अशा वातावरणातही जगण्याची उमेद वाढवणाऱ्या काही बातम्या येत आहे. सुनीता शिटोला यांची कथाही काहीशी अशीच आहे. सुनीता म्हणाल्या की, मी जगण्याची आशाच सोडली होती. पण धैर्य नव्हते सोडले. आजुबाजुला थोडा जरी आवाज झाला तरी मी मदतीसाठी धावा करत होते.

काठमांडूमध्ये शनिवारी दुपारी आलेल्या भीषण भुकंपात पाच मजली इमारत कोसळल्याने सुनिता ढिगाऱ्यात दबल्या गेल्या होत्या. त्यांना सोमवारी रात्री उशीरा बाहेर काढण्यात आले. सुमारे 36 तास काहीही न खाता पिता राहिलेल्या सुनिताला सुखरुप बाहेर काढण्यात आले.

जेव्हा भूकंप आला त्यावेळी काठमांडूच्या वसुंधरा परिसरात असलेल्या इमारतीत सुनिता किचनमध्ये काम करत होत्या. त्यामचा मुलगा आणि पती भूकंप येताच घरातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते. पण सुनिता ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. त्या सारख्या आवाज देत होत्या पण बाहेत त्यांचा आवाज येत नव्हता. सोमवारी रात्री सुमारे 36 तासांनंतर येथे पोहोचलेल्या भारतीय बचावपथकांनी त्यांची सुटका केली.

एयरफोर्सने वाचवले हजारोंचे प्राण
इंडियन एयरफोर्सच्या मदतीने आतापर्यंत 5400 नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढून भारतात आणण्यात आले आहे. मदत कार्यासाठी भारत-नेपाळ सीमेचे 12 चेक पोस्ट एसएसबीने पीडितांसाठी उघडले. इंडियन एयरफोर्सचे हेलिकॉप्टर जखमींना रुग्णालयात आणि सुरक्षित स्थळी हलवत आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालानुसार नेपाळच्या 39 जिल्ह्यांमध्ये सुमारे 80 लाख लोकांवर या भूखंपाने विपरीत परिणाम झाला आहे. तर 14 लाख लोक अजूनही अन्न आणि उपचारांच्या प्रतिक्षेत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेपाळमध्ये मदत पोहोचवली जात आहे. पण वैद्यकिय सुविधांच्या कमतरतेमुळे जखमींच्या उपचारात अडचणी येत आहेत.

माऊंट एव्हरेस्टवर अडकलेल्या गिर्यारोहकांना वाचवले
भूकंपानंतर हिमस्खलनामुळे एव्हरेस्टवर फसलेल्या सर्व गिर्यारोहकांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. पर्यटन विभागाचे प्रमुख तुलसी गौतम यांना दिलेल्या माहितीनुसार 3 हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथके कँप वन आणि टू वर मोहीम राबवत आहे. हिमस्खलनामुळे बेस कँपमध्ये 18 जण ठार झाले. फसलेल्या 150 गिर्यारोहकांना मात्र गंभीर जखमा झाले नसल्याचे मानले जात आहे. ते बर्फाच्या तुकड्यात अडकले होते. खाली येण्याचा रस्ता बंद झाल्याने सर्वांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बचावकार्याचे PHOTO