आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कट्टरपंथियांच्या धमक्या झुगारून न्यूज चॅनल चालवतात या धाडसी महिला...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवाद्यांच्या धमक्या झुगारून ह्या महिला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपत आहेत. - Divya Marathi
दहशतवाद्यांच्या धमक्या झुगारून ह्या महिला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपत आहेत.
इंटरनॅशनल डेस्क - अफगानिस्तानच्या रुढीवादी समाजात बदल घडून येत असताना दिसत आहे. एकेकाळी चार भिंतींमध्ये कैद राहणाऱ्या अफगाणी महिला या बदलात सक्रीय सहभाग घेत आहेत. काबूल शहरातून नुकतेच झॅन टीव्ही न्यूज चॅनल लाँच झाले आहे. या चॅनलचे वैशिष्ट्य म्हणजे, याची सर्वस्वी जबाबदारी येथील महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. अर्थातच या चॅनलच्या अँकर, रिपोर्टर आणि प्रॉडक्शनपासून अगदी ब्रॉडकास्ट पर्यंतचे काम महिला करत आहेत. एवढेच नव्हे, तर या चॅनलवर दाखवले जाणारे प्रोग्राम आणि न्यूज सुद्धा महिलांच्या विषयांवर केंद्रीत आहेत. 
 

अभिव्यक्ति स्वातंत्र्यासाठी पुढे आल्या या रणरागिणी
- झॅन टीव्ही महिला चॅनल म्हणूनही ओळखल्या जात आहे. याची सुरुवात 21 मे 2017 रोजी करण्यात आली आहे. 
- सद्यस्थितीला यात 50 महिला काम करत आहेत. ज्या वृत्तनिवेदन, लेखन, आणि प्रॉडक्शनसह सर्वच कामकाज पाहत आहेत. 
- यात काम करणाऱ्या बहुतांश महिला अनुभवी नाहीत. तरीही त्यांना कामावर तांत्रिक बाबी समजावून सांगताना प्रशिक्षण सुद्धा दिले जात आहे. 
- यासाठी चॅनलचे एडिटिंग आणि कॅमरा वर्क पाहण्यासाठी, देखरेख करण्यासाठी 10 पुरुष कर्मचारी सुद्धा ठेवण्यात आले आहेत. तेच यांना ब्रॉडकास्टिंग मीडियामध्ये प्रत्येक बाबीत तरबेज करण्याचा प्रयत्न करत आहेत. 
- चॅनलच्या चर्चासत्रापासून रिपोर्टिंग पर्यंत सर्वच ठिकाणी महिलांवर केंद्रीत विषय निवडले जात आहेत. जेणेकरून महिलांना जगात होणाऱ्या घडामोडी आणि त्याचा देशात कसा अवलंब करता येईल यावर जागृक करता येईल. 
- येथे काम करणाऱ्यांपासून मालकापर्यंत सर्वांना दररोज कट्टरपंथिय समूह आणि दहशतवाद्यांच्या धमक्या मिळत आहेत. त्यांचे कुटुंब सुद्धा हे काम सोडण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत आहेत. 
- चॅनलमध्ये काम करणाऱ्या खतिरा अहमदी यांनी सांगितल्याप्रमाणे, या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या अधिकारांबद्दल जागृत केले जात आहे. ही एक मोहिम असून त्यासाठी स्वतःला झोकून काम करणार असल्याचे त्या सांगतात. 
 
 
या व्यक्तीने केली सुरुवात
झॅन चॅनलची सुरुवात हमीद समर यांनी केली आहे. समर यांनी सांगितल्याप्रमाणे, अफगाणिस्तानातील मीडियामध्ये महिलांची भागिदारी अतिशय कमी आहे. त्यांना सशक्त करणे हेच आमचे मूळ उद्दिष्ट आहे. अफगाणिस्तानच्या मीडियामध्ये केवळ पुरुषांना संधी दिली जाते. ही प्रथा बंद करण्यासाठी, महिलांना पुरुषांच्या बरोबरीने उभे करण्यासाठी आणि महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्यासाठी या चॅनलची सुरुवात करण्यात आली आहे. 
 

पुढील स्लाइड्सवर पाहा, चॅनलमध्ये अशा प्रकारे काम करतात अफगाणी महिला, तरुणी...
बातम्या आणखी आहेत...