आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अफगाणिस्तानात युवतीने सुरू केला महिलांचा पहिला फिटनेस क्लब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल- अफगाणिस्तान रूढीवादी देश मानला जातो, पण आता तेथे मोठे सामाजिक बदल दिसत आहेत. विशेषत: महिलांच्या प्रवेशावर बंदी असलेल्या क्षेत्रांत. अशाच बदलापैकी एक आहेत काबूलच्या तहमीना माहिद नूरिस्तानी. त्यांनी काबूलमध्ये देशातील पहिले महिला जिम सुरू केले आहे. १३ लाख रुपयांच्या या जिमला त्यांनी ब्ल्यू मून फिटनेस क्लब असे नाव दिले आहे. नूरिस्तानी म्हणाल्या,‘ मी महिलांना फिटनेस, खेळासोबत स्वसंरक्षणासाठी प्रेरित करू इच्छिते. क्लबमध्ये ट्रेनरही महिलाच आहेत. देशात लोक मुलींना शाळेत जाण्यास किंवा घराबाहेर काम करण्यास रोखतात. समाजाच्या या शृंखला तोडून पुढे जाण्याची इच्छा असलेल्या मुली किंवा महिलांसाठी हा क्लब समर्पित आहे.’ क्लबमध्ये ५० सदस्य आहेत, त्यात १७ वर्षीय मुलींपासून ७० वर्षीय ज्येष्ठ महिलाही आहेत.  

 

 

महिलांचे टीव्ही चॅनल चालवताहेत महिला  
अफगाणिस्तानमध्ये महिलाच चालवत असलेले पहिले टीव्ही चॅनल सुरू झाले आहे. या चॅनलचे नाव आहे जॅन टीव्ही. या चॅनलवर महिलांशी संबंधित कार्यक्रमच प्रसारित होतात. फक्त पाच महिन्यांपूर्वी सुरू झालेले हे चॅनल देशाच्या टीव्ही रेटिंगमध्ये सतत स्थान राखून आहे.  

 

बागलाणमधील रेस्तराँमध्ये व्यवस्थापक, वेटरही महिलाच  
अफगाणिस्तानच्या बागलाण प्रांतात २० महिलांच्या गटाने महिला संचालक असलेले देशातील पहिले रेस्तराँ सुरू केले आहे. तेथील कर्मचारीही महिलाच आहेत. या रेस्तराँत जिमची सुविधाही मिळत आहेत. या गटाच्या प्रमुख आणि रेस्तराँच्या मालक गीती यांनी सांगितले,‘आम्ही आमच्या रकमेतून हे रेस्तराँ स्थापन केले आहे. सरकार आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.’  

बातम्या आणखी आहेत...