आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US मिलिट्रीमध्ये महिलांना दिले जाते असे ट्रेनिंग, पाजतात सापाचे रक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थायलंडच्या चोन बुरी प्रांतातील जंगलामध्ये ट्रेनिंगदरम्यान कोब्रा सापाचे रक्त पिणारी अमेरिकेची सैनिक. - Divya Marathi
थायलंडच्या चोन बुरी प्रांतातील जंगलामध्ये ट्रेनिंगदरम्यान कोब्रा सापाचे रक्त पिणारी अमेरिकेची सैनिक.
अमेरिकेत लष्करात भरती झाल्यानंतर महिलांना अत्यंत कठीण ट्रेनिंगला सामोरे जावे लागते. जंगलातील ट्रेनिंगदरम्यान तर त्यांना वन्य प्राण्यांशी लढण्याबरोबरच जगण्यासाठी सापाचे रक्त पिण्याचे ट्रेनिंगदेखिल घ्यावे लागते.

अमेरिकेच्या लष्करात 1775 पासून महिलांचा समावेश
तसे पाहता अमेरिकेच्या लष्करात महिला 1775 पासून सेवा देतात. पण तेव्हा त्यांच्याकडे नर्स, लॉड्री आणि कुकिंगपेक्षा इतर जबाबदारी दिली जात नव्हती. अमेरिकेच्या गृह युद्धात शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. पण सर्व महिला पुरुषांच्या पोशाखात सहभागी झाल्या होत्या. 1948 मध्ये अकेर महिलांना लष्करात कायदेशीररित्या कायमचे स्थान मिळाले. पण महिलांना कॉम्बॅट ऑपरेशनमध्ये सहभागी होण्याची परवानगी नव्हती.

धोरणात बदल...
2013 मध्ये लष्कराने महिलांना थेट लढाईसाठीच्या युनिटमध्ये सहभागी करण्यास मज्जाव असणारे धोरण रद्द केले. त्यानंतर 2014 मध्ये अमेरिकेच्या लष्कराने 33 हजार अशा नव्या पदांची घोषणा केली, जी पूर्वी महिलांसाठी नव्हती. सध्या लष्करामध्ये 78 टक्के पदांवर महिला काम करू शकतात. मात्र कॉम्बॅट ऑपरेशन्समध्ये फ्रंट लाइनवर सेवा देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य अजूनही महिलांना मिळालेले नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, महिला सैनिकांच्या ट्रेनिंगचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...