आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरिया: इसिसच्या विरोधात युद्ध लढण्यासाठी परवानगी मिळाल्याने महिला सैनिकांत जल्लोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमास्कस- हे छायाचित्र सिरियातील सरकारी सैन्याच्या महिला तुकडीचे (एसडीएफ) आहे. लष्करी प्रशिक्षण पूर्ण झाल्याचा आनंद या सैनिकांनी गुरुवारी साजरा केला. २१० महिलांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. प्रशिक्षणानंतर त्यांच्या इच्छेनुसार इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी राकामध्ये तैनात करण्यात आले आहे.
 
राका इसिस दहशतवाद्यांचा गड मानला जातो. महिलांची तुकडी इसिस दहशतवाद्यांच्या विरोधात मोर्चा उघडेल. महिला सैनिक लाल्या हुसेन म्हणाली, ‘इसिसच्या अमानुषतेच्या विरोधात उभे राहणे हा आमचा उद्देश आहे. महिला किती मजबूत असतात हे आम्ही त्यांना दाखवून देणार आहोत. आम्ही दहशतवाद्यांना या प्रदेशातून पळवून लावू. आम्हाला मृत्यूची भीती वाटत नाही.
बातम्या आणखी आहेत...