आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खांद्याला खांदा भिडवून काम करतच राहू - नरेंद्र मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली. गेल्या दोन वर्षांतील त्यांची ही सातवी भेट आहे. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदींनी अणुपुरवठादार समूहात (एनएसजी) आणि क्षेपणास्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेत (एमटीसीआर) भारताला अमेरिकेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल अाेबामांना धन्यवाद दिले.

भारत-अमेरिका मैत्री
मोदी म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून भारत आणि अमेरिका हवामान बदल, अणुसुरक्षा, दहशतवादासारख्या जागतिक समस्येवर एकत्रितपणे काम करत आहेत. याचा आपल्याला अभिमान आहे. दोन मित्र म्हणूनच नव्हे तर दोन देश म्हणून मैत्रीचा धागा दृढ होत आहे. यापुढेही आम्ही असेच खांद्याला खांदा भिडवून काम करत राहू. दोन्ही नेत्यांनी अनेक व्यापक मुद्दे, विशेषकरून द्विपक्षीय आर्थिक संबंधांना नव्या उंचीवर नेण्याबाबतच्या पद्धतींवर विचार-विनिमय केला. यासोबत त्यांनी स्वच्छ ऊर्जा, क्षेत्रीय सुरक्षा आणि सायबर सुरक्षेसारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

पुढे वाचा... पीएम मोदींच्या नेतृत्वासाठी त्यांचे अभिनंदन : ओबामा
बातम्या आणखी आहेत...