टेम्पे- एरिझोनातील या शहरात पार्किगमध्ये एका मजूराला एक सॅक मिळाली. सुरुवातीला त्याला वाटले की ही कुणाची तरी हरवलेली अथवा विसरलेली सॅक असेल. ती बॅग उघडल्यावर मात्र त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. या बॅकमध्ये चक्क नवजात मुलगी होती.
असे आहे प्रकरण
- एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, टेम्पे शहरातील फूट सिटी ग्रोसरी स्टोअरमध्ये रविवारी एक मजूर काही कामानिमित्त गेला होता.
- त्याच वेळी त्याची नजर शॉपिंग कार्टवर पडली. तिथे एक सॅक ठेवलेली होती.
- त्याने ती सॅक उघडली असता त्यात त्याला शालीत गुंडाळलेले एक नवजात मुलगी दिसुन आली.
- या नवजात मुलीची नाळ देखील नुकतीच कापलेली दिसत होती.
- या मुलीचा जन्म 24 तासांपूर्वीच झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सॅकमध्ये ठेवण्यात आल्याने या मुलीला श्वास घेण्यासही त्रास होत होता.
- मॅनेजरने सॅकमधुन या चिमुकलीला काढुन त्याची माहिती पोलिसांना दिली.
- पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या चिमुकलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले.
- डॉक्टरांनी या चिमुकलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले.
- काही काळ तिला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आल्यानंतर तिची स्थिती सुधारली.
- पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून तिच्या आई-वडिलांचा शोध घेण्यात येत आहे.