आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगभरातील महिला बोलतात पुरुषांपेक्षा उत्तम इंग्रजी; नेदरलँड अव्वल, भारत २२ व्या स्थानावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुसाने(स्वित्झर्लंड) - अस्खलित इंग्रजी बोलता यावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अशात जगात सर्वांत चांगली इंग्रजी कोणत्या देशात बोलली जाते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर नेदरलँड आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क व तिसऱ्या क्रमांकावर स्वीडन आहे. येथील बहुतांश लोक चांगली इंग्रजी बोलतात. भारताचा क्रमांक २२ वा आहे. येथील नागरिक सरासरी चांगली इंग्रजी बोलतात. जगात महिला पुरुषांपेक्षा चांगली इंग्रजी बोलतात. भारतातही हीच स्थिती अाहे.

एज्युकेशन फर्स्ट कंपनीने आपल्या इंग्लिश प्रोफिसिएन्सी इंडेक्स अहवालात ही बाब समाेर अाणली. ७२ देशांत इंग्लिश प्रोफिसिएन्सी ऑनलाइन टेस्ट घेतली. यामध्ये ९ लाख ५० हजार प्रौढ सहभागी झाले होते. चीन ३९ व्या व पाक ४८ व्या क्रमांकावर आहे. भारताचा निर्देशांक ५७.३०% आहे. आशियाई देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. सिंगापूर अाशियात पहिल्या, तर जगात सहाव्या क्रमांकावर आहे.
उत्पन्न चांगले, तिथे इंग्रजी अस्खलित
ज्या देशात उत्पन्न व जीवनशैली चांगली आहे तेथील लोक इंग्रजी बोलतात. एज्युकेशन फर्स्टचे संचालक मिन ट्रॉन म्हणतात, चांगली इंग्रजी बोलण्यासाठी दर्जेदार शैक्षणिक व्यवस्था आणि इंग्रजी बोलण्याचे वातावरण हवे. सिंगापूरला जाल तर गल्लीतही इंग्रजी बोलणारे लोक दिसतील. युवक चिनी, मलाया व इंग्रजी भाषा मिश्र बोलतात. इंग्रजी गाणीही ते गुणगुणतात.
जगातील टॉप 5 देश
देश इंग्लिश प्रोफिसिएन्सी इंडेक्स
नेदरलँड 72.16%(अतिशय उत्तम इंग्रजी)
डेन्मार्क 71.15%(अतिशय उत्तम इंग्रजी)
स्वीडन 70.81%(अतिशय उत्तम इंग्रजी)
नाॅर्वे 68.54%(अतिशय उत्तम इंग्रजी)
फिनलँड 66.61%(उत्तम इंग्रजी)
बातम्या आणखी आहेत...