आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक हवामान बदल परिषदेस जर्मनीत प्रारंभ, आंदोलनांनाही वेग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉन- जर्मनीमध्ये विविध देशांचे राजनयिक आणि पर्यावरण कार्यकर्ते दोन आठवडे चालणाऱ्या जागतिक हवामान बदल परिषदेत सहभागी झाले आहेत. सोमवारी या २३ व्या परिषदेस सुरुवात झाली. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणवाद्यांची आंदोलनेदेखील बॉन शहराच्या रस्तोरस्ती दिसून येत आहेत. जर्मनीमध्ये कोळशाचा वापर इंधन म्हणून होत असल्याकडे येथील पर्यावरणवाद्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले आहे. फिजीचे पंतप्रधान व्होरेक्यू फ्रँक यांच्या हस्ते परिषदेचे उद््घाटन झाले.  २०१५ मध्ये झालेल्या पॅरिस हवामान बदल करारावर येथे चर्चा होणार असून आगामी काळात ग्लोबल वाॅर्मिंगचे प्रमाण १.५ अंशापर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी करारावर टीका केली.मनुष्यनिर्मिती हवामान बदलावर हवामान करारात ठोस उपाय नसल्याचे ते म्हणाले. 
 
चेन्नई- हवामान बदलाविरुद्ध माध्यमांनी मोहीम हाती घ्यावी : पीएम  
 माध्यमांनी हवामान बदलाच्या परिणामांविषयी अधिकाधिक जनजागरण करावे.नैसर्गिक आपत्तीकाळात माध्यमे सजगतेने वार्तांकन करतात. मात्र याच्या मूलभूत कारणांविषयी जागर करणे महत्त्वाचे आहे, असे मोदी म्हणाले. तामिळनाडू येथील दिना थांथी या दैनिकाच्या प्लॅटिनम ज्युबिलीनिमित्त मोदी बोलत होते. मद्रास विद्यापाठीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
 
१९६ देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती 
या १२ दिवसीय परिषदेसाठी १९६ देशांचे प्रतिनिधी बॉनमध्ये दाखल झाले आहेत. जागतिक  तापमानाचे प्रमाण २ अंश सेल्सियस नियंत्रित ठेवण्याचे उद्दिष्ट पूर्वी होते. आता ते १.५ अंश सेल्सियस निश्चित करण्यात आले आहे. कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन हे ग्रीन हाऊस इफेक्टसाठी जबाबदार घटक कमी करण्याच्या दिशेने कृती कार्यक्रम या परिषदेत आखण्यात येईल.  
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, २०१७ हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमानाचे वर्ष ... 
बातम्या आणखी आहेत...