आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेताजींबाबतची शक्यता गांधींनी वर्तवली होती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत असल्याचा भ्रम महात्मा गांधींनी पसरवला होता. नेताजींविषयी विकसित करण्यात आलेल्या संकेतस्थळावर हा दावा करण्यात आला आहे.

या संकेतस्थळानुसार नेताजींच्या कथित मृत्यूची घोषणा झाल्यानंतर पाच महिन्यांनी जानेवारी १९४६ मध्ये महात्मा गांधी म्हणाले होते, ‘मला वाटते, बोस जिवंत असावेत. ते योग्य वेळी सर्वांसमोर येतील. महात्मा गांधींची प्रतिमा विश्वासार्ह होती. त्यामुळे भारतीय व ब्रिटिशांमध्येही नेताजी हयात असल्याचा भ्रम पसरला. त्याच वर्षी मार्चमध्ये गांधीजींनी आपल्या हरिजन पत्रिकेत लिहिले, ‘माझा असा समज झाला होता की, नेताजी जिवंत आहेत.
बातम्या आणखी आहेत...