आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍थानकात बनवली जगातील सर्वात मोठी सायकल पार्किंग, क्षमता 12500

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅमस्टरडॅम- हे नेदरलँडच्या उट्रेच शहरात रेल्वे स्थानकाच्या खाली बनवलेली सायकल पार्किंग. जगातील सर्वात मोठ्या या भूमिगत पार्किंगमध्ये १२५०० सायकली ठेवता येतात. २१ ऑगस्ट म्हणजेत सोमवारी ते औपचारिकरीत्या खुले होईल. जगात नेदरलँडमध्येच सायकलींचा वापर सर्वाधिक होतो. त्याची सुरुवात ४६ वर्षांपूर्वी झाली.  तेव्हा रस्ते अपघातात तीन हजार लोक ठार झाले होते. त्यात ४५० मुले होती.  आता तेथे सायकलींचा वापर वाढला आहे. त्यामुळे देशभरात २२ हजार साकल पार्किंग बनवण्याची योजना आहे.

प्रति व्यक्ती १.३ सायकल
नेदरलँडमध्ये प्रति व्यक्ती १.३ सायकल आहे. ७० टक्के लोक सायकलने कार्यालयात जातात. ४३%(१० किमी पर्यंत) सायकलने प्रवास करतात. सुमारे २७%लांब पल्ल्याचा प्रवास सायकलने करतात. राजधानी अॅम्स्टर्डममध्ये ८.१४ लाख लोक राहतात. सायकली १० लाख आहेत. सायकलसाठी ४०० किमी लांबीच्या मार्गिका आहेत.

अर्थव्यवस्थेला दीड लाख कोटींचा लाभ
सायकलच्या वापरामुळे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वार्षिक सुमारे ६,५०० ने घट झाली. त्याचबरोबर सरासरी जीवनमान सहा महिन्यापर्यंत वाढले. त्यामुळे अर्थव्यवस्थेत १९ अब्ज युरो अर्थात सुमारे १.५ लाख कोटी रुपयांची भर पडली. ही रक्कम नेदरलँडच्या जीडीपीच्या ३ टक्के आहे.

देशात लहानपणापासूनच सायकल चालवण्याची सवय
- नेदरलँडमध्ये १९५० च्या दशकानंतर कारची संख्या वेगाने वाढली. त्यामुळे रस्त्यावरील अपघात वाढले. १९७१ मध्ये अशा अपघातात सर्वाधिक ३ हजार लोकांचा बळी गेला. त्यात ४५० मुलांचा मृत्यू झाला होता. त्याच्या विरोधात ‘स्टॉप द चाईल्ड मर्डर’ सारखी निदर्शने झाली.
- १९७३ मध्ये तेल निर्यात करणाऱ्या देशांनी कच्च्या तेलांचा पुरवठा रोखला आहे. या दुहेरी दबावानंतर सरकारने सायकलला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा पायाभूत सुविधेवर काम केले. देशभरात सायकल मार्गिकांचे जाळे तयार करण्यात आले.
- मुलांसाठी विशेष सायकल डिझाइन करण्यात आले. लहानपणीच मुलांमध्ये सायकलीची सवय लागू लागली. त्यांनी मोटार वाहन चालवू नये, असा त्यामागील हेतू होता. त्यासाठी हा कडक नियम तयार करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...