आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वात निर्दयी आणि श्रीमंत ड्रग्स माफिया, दरवर्षी उंदीर खात कोट्यावधी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेशनल डेस्क - जगभरात पैसे कमावण्यासाठी लोक वेगवेगळ्या पध्दतींचा वापर करतात. कोणी सरळ मार्गाने पैसे कमावतो, तर कोणी चुकीचे मार्ग निवडतात. मॅक्सिकोमध्ये शुक्रवारी झालेल्या एन्काऊंटरमध्ये अवैधरित्या आम्ली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला. असाच काही एन्काऊंटर २० वर्षांपूर्वी कोलंबियामध्ये झाला होता. या एन्काऊंटरमध्ये अत्यंत निर्दयी ड्रग्स व्यापारी पाब्लो एमिलियो एस्कोबार गॅविरिया याला ठार मारण्यात आले.

पाब्लो एमिलियो एस्कोबार गॅविरिया हा कोलंबियाचा ड्रग माफीया होता. कोकेनचा व्यवसाय करणारा पाब्लोला जगातील सर्वात निर्दयी आणि सर्वात श्रीमंत गुन्हेगार मानले जाते. पाब्लोचा भाऊ रॉबर्टो एस्कोबार यांचे पुस्तक 'द एकाउंट्स स्टोरी' मध्ये दिलेल्या माहितीनुसार, पाब्लो एका दिवसाला तब्बल 15 टन कोकेनची तस्करी करत होता. 1989 मध्ये फोर्ब्स मॅगझिनने एस्कोबारला जगातील सर्वात श्रीमंत गुन्हेगारांच्या यादीत 7 वे स्थान दिले होते. त्याची अंदाजे खासगी संपत्ती जवळपास 30 बिलियन डॉलर म्हणजे 1600 अब्ज रुपये. त्याच्याजवळ अनेक लक्झरी बंगले आणि गाड्यासुध्दा होत्या.
उंदीर खात होते कोट्यावधी रुपये
पाब्लोचा भाऊ रॉबर्टो यानी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी पाब्लोचे उत्पन्न वर्षाला 126988 कोटी रुपये एवढे होते, त्यावेळी त्याच्या १० टक्के रक्कम तर गोदामातील उंदीर खात होते. नाही तर पाणी अथवा इतर कोणत्याही कारणामुळे खराब होत होते. रॉबर्टोने सांगितलेल्या माहितीनुसार, तो 2,500 डॉलर रुपये तर दर महिन्याला नोटांना बांधणासाठीच्या रबरांवर खर्च करत होता. 1986 मध्ये त्याने कोलंबहियाच्या राजकारणात उतरण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्याने देशावरील 10 बिलियन डॉलर (5.4 खरब रुपये) चे राष्ट्रीय कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, एस्कोबार यांच्या कुटुंबाविषयी