आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेसाेडेनियामध्ये वरातीत वर नव्हे, वधू घोड्यावर बसून जाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या पिढीला परंपरा सांगण्यासाठी होतात विवाह
मेसाेडेनियाची राजधानी स्कोपजेमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाह समारंभासाठी आपल्या नवऱ्याला घेऊन जाण्यासाठी घाेड्यावर बसून आलेली नववधू. येथे काही विशिष्ट जोडप्यांसाठी सेंट पीटर्स डेनिमित्त पारंपरिक वेडिंग फंक्शन आयोजित केले जाते. ते तीन दिवस चालते. नव्या रूढी-परंपरांची नव्या पिढीला ओळख व्हावी म्हणून अशा पद्धतीने विवाह सोहळा आयोजित केला जातो. हिंदू विवाहात नवरा मुलगा घोड्यावरून येतो. येथे नववधू घोड्यावरून येते.

नवरदेव पारंपरिक नृत्य करून करतो स्वागत
विवाह समारंभात वधू साखरपुड्याच्या अंगठीतून नवऱ्याला बघते. नवरी व तिचे नातेवाईक जेव्हा नवरदेवाच्या घरी पोहोचतात तेव्हा नवरदेव स्वत: पारंपरिक नृत्य करून त्या सर्वांचे स्वागत करतो. आपली टोपी हलवून त्यांना आत येण्यास सांगतो. विवाहाच्या आधी एक मिरवणूक निघते. त्यात लोक पारंपरिक कपडे परिधान करून हातात टॉर्च घेऊन परिसरात चक्कर मारतात.
बातम्या आणखी आहेत...