जगप्रसिद्ध वाइल्ड लाइफ फोटोग्राफरने इंटरनेटवर काही सुंदर फोटो अपलोड करून ते काढण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाची माहिती दिली आहे. हे फोटो आकर्षक तर आहेतच शिवाय दुर्लभ श्रेणीतीलही आहेत.
चिमणी आणि मगरीत असते मैत्री
चेकगणराज्याचे फाेटोग्राफर पेत्र वोपेन्काने या फोटोमध्ये चिमण्या आणि मगरीची मैत्री दाखवली आहे. ते म्हणतात की, अनेक वेळा मगर तोंड उघडे केलेल्या अवस्थेत दिसतात. ते ओव्हर हिटिंगपासून वाचण्यासाठी असे करत असावे, असा समज आहे. मात्र, हे पूर्ण सत्य नाही. ते दातांमध्ये काही अडकल्यानंतर त्याची सफाई करण्यासाठी ते तोंड उघडून बसतात. हे काम चिमण्या करतात. विशेष रूपाने प्लॉवर प्रजातीच्या चिमण्या हे काम करतात. त्या मगराच्या दातात अडकलेल्या वस्तू बाहेर काढतात. यादरम्यान ते काहीच करत नाही, कारण त्यांना बरे वाटते.