आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत ISIS चे जगातील 5 Most Wanted दहशतवादी, सेकंड इन्चार्ज ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून) अब्द अल रहमान मुस्तफा अल कादुली, अबू बक्र अल बगदादी, तरखान बतिराश्विली, तारीक अल अव्नि अल हर्जी आणि अबू मोहम्मद अल अदनानी. - Divya Marathi
(डावीकडून) अब्द अल रहमान मुस्तफा अल कादुली, अबू बक्र अल बगदादी, तरखान बतिराश्विली, तारीक अल अव्नि अल हर्जी आणि अबू मोहम्मद अल अदनानी.
क्रूर दहशतवादी संघटना ISIS चा सेकंड इन्चार्ज अबू मुताज अल-कुरेशी मारला गेला आहे. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी ऑगस्ट महिन्यात हवाई ह्ल्ल्यांमध्ये त्याला ठार केले. संघटनेने या वृत्ताला आता दुजोरा दिला आहे. अमेरिकन नॅशनल सेक्युरिटी काऊन्सिलच्या मते कुरेशी ISIS चीफ अबू बक्र अल-बगदादीचा सिनियर डेप्युटी होता.

अमेरिकेने या संघटनेच्या 5 मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांवर 30 मिलियन डॉलर (सुमारे 190 कोटी) रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. त्यात ISIS चीफ अबू बक्र अल बगदादी, अब्द अल रेहमान मुस्तफा अल कादुली, अबू मोहम्मद अल अदनानी, तरखान बतिराश्विली आणि तारीक अल अव्नि अल हर्जी यांची नावे आहेत.
कोण आहे कुरेशी...
- कुरेशीला ISIS मध्ये बगदादीनंतर दुसरे स्थान मिळाले होते. त्याचे खरे नाव फदहील अहमद अल-हयाली होते. तो IS रुलिंग काऊन्सिलचा मेंबरही होता.
- कुरेशीचे काम इराक आणि सिरियामध्ये दहशतवाद्यांना गाड्या, बॉम्ब, गन्स आणि इतर शस्त्रास्त्रे पुरवून कोऑर्डीनेशन करायचे असे होते.
- व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, कुरेशी इराकमध्ये ISIL नंतरचे ISIS चा इन्चार्ज होता. याठिकाणी तो दोन वर्षांपासून प्लॅनिंग ऑपरेशनमध्ये होता.
- तो सिनिअर दहशतवाद्यांप्रमाणे आधी इराकमध्ये अल कायदाचा मेंबर होता.
- सद्दाम हुसेनच्या शासन काळात कुरेशी इराकी ऑफिसरच्या पदावरही होता.

पुढील स्लाइड्सवर वाचा, जगातील 5 मोस्ट वाँटेड ISIS दहशतवाद्यांवरील बक्षीसाबाबत... (INFOGRAPHICS)