आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात मोठे हॉटेल 74 वर्षापासून पडलेय ओसाड, 10 हजार आहेत रूम्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीतील बाल्टिक समुद्राच्या किना-यावरील रुगेन आयलँडवरील हॉटेल दा प्रोरा. ज्यांची लांबी 4.5 किलोमीटर आहे. - Divya Marathi
जर्मनीतील बाल्टिक समुद्राच्या किना-यावरील रुगेन आयलँडवरील हॉटेल दा प्रोरा. ज्यांची लांबी 4.5 किलोमीटर आहे.
बर्लिन- जर्मनीत बाल्टिक समुद्राच्या रुगेन आयलँडवरील हॉटेल दा प्रोरा जगातील सर्वात मोठे हॉटेल आहे. सी-फेसिंग असलेले या हॉटेलमध्ये 10,000 बेडरूम आहेत. मात्र, धक्कादायक बाब ही आहे गेली 74 वर्षे हे हॉटेल ओसाड पडून आहे. एवढ्या वर्षापासून येथे एकही प्रवासी थांबला नाही. नाझी शासन कालखंडात या भव्य व बड्या हॉटेल बांधले गेले. 1936 ते 1939 या काळात याचे काम केले गेले. का बनवले मग हे हॉटेल...
- हे हॉटेल बनविण्यासाठी 9000 लेबरफोर्सने तीन वर्षे सलग काम केले.
- नाझींनी हे हॉटेल एक प्रोग्रॅम स्ट्रेंथ थ्रू ज्वॉय नुसार बनवले होते.
- स्थानिक लोक बिल्डिंगसारखे स्मारकाच्या ढाच्यात बनवल्याने याला प्रोरा (द कोलोसस) म्हणतात.
- ज्याचा अर्थ वृक्षांनी व्यापलेले, झाडातील मैदान पण मोकळी भूमी असा होतो.
- यात एक सारखी 8 बिल्डिंग बनवली गेली. प्रत्येक बिल्डिंगची लांबी 4.5 किलोमीटर आहे.
- ही बिल्डिंग समुद्रापासून केवळ 150 मीटर दूरवर आहे. यात चार एक सारखी रिसॉर्ट होती. ज्यात सिनेमा, फेस्टिवल हॉल, स्वीमिंग पूल आणि एक जेट्टी सुद्धा होती. येथे एक क्रूज शिप सुद्धा उभा राहू शकते.
हिटलरच्या आदेशाने सुरु होते काम-
- जर्मनीची हुकुमशहा अडॉल्फ हिटलर यात सी रिसॉर्ट बनवू इच्छित होता, जो जगातील सर्वात मोठे असेल.
- हिटलरला वाटत होते की, या बिल्डिंगमध्ये 20,000 हून अधिक बेडरूम असावेत.
- हिटलरचा हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट पूर्ण होण्याआधीच दुसरे महायुद्ध सुरु झाले.
- आज सुद्धा ही इमारत तेवढीच सुंदर दिसत आहे. मात्र, काहींची अवस्था खराब झाली आहे.
- 2011 मध्ये यातील एका ब्लॉकमध्ये 400 बेडचे एक रूग्णालय बनवले गेले.
- आता प्रोरा ला 300 बेडचे एक हॉलिडे रिसॉर्ट बनवण्याचा विचार सुरु आहे.
- पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, याच्याशी संबंधित आणखी काही फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...