आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठया 'पिटबुल' डॉगने दिली 8 पिले, प्रत्येकाची किंमत 19 लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्लन आणि त्याच्या कुटुंबासह जगातील सर्वात मोठा पिटबुल डॉग. - Divya Marathi
मार्लन आणि त्याच्या कुटुंबासह जगातील सर्वात मोठा पिटबुल डॉग.
फोटोमध्ये आपण न्यू हॅम्पशायर (अमेरिका) येथे राहणारा जगातील सर्वात मोठा डॉगी 'हल्क' पाहत आहात. हा जगातील सर्वात मोठा 'पिटबुल' (कुत्र्याची एक प्रजाती) म्हणूनही ओळखला जातो. नुकतेच हल्कने 8 मुलांना जन्म दिला. त्यांची किंमत 160,000 पाउंड (सुमारे 1.58 कोटी रुपये) एवढी असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.

मिरर या वेबसाईट्या मते, हल्कच्या एका पपीची किंमत 30 हजार डॉलर (सुमारे 19 लाख रुपये) असेल. त्याचवेळी जर ते हल्कचे पिलू आहे असे, समजले तर पिलाची किंमत वाढू शकते अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. हल्कचा मालक मार्लन ग्रेननच्या मते, जर प्रत्येक पपीची व्यवस्थित काळजी घेण्यात आली तर एकाची किंमत 55 हजार डॉलर (35 लाख रुपये) किंवा त्यापेक्षाही जास्त मिळू शकते.

गेल्यावर्षी जगासमोर येत या महाकाय कुत्र्याने सर्वांना धक्का दिला होता. हल्कने एक प्रोटेक्शन डॉग म्हणूनही ट्रेनिंग घेतले आहे. त्याचे वजन 76 किलो आहे. त्याच्या मालकाच्या मते हा कुत्रा कोणत्याही माणसाचा हा, एखाद्या टूथपिकप्रमाणे चावू शकतो. कुत्र्यांमध्ये पिटबुल ही प्रजाती अत्यंत धोकादायक समजली जाते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगातील सर्वात मोठा पिटबुल आणि त्याच्या पपीजचे काही PHOTOS