आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे जगातील सर्वात धोकादायक ड्रग्स \'क्रोकोडाइल\' घेण्‍या-यांची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2002 पासून रशियाचे नव्हेतर जगातील सर्व भागातील लोकांना आपल्या कवेत घेतले आहे. - Divya Marathi
2002 पासून रशियाचे नव्हेतर जगातील सर्व भागातील लोकांना आपल्या कवेत घेतले आहे.
एका दशकापूर्वी रशियन डॉक्टरांनी काही ड्रग अॅडिक्ट्सच्या बॉडीवर व्रण पाहिले. हे मगरीच्या कातड्याप्रमाणे काळ्या रंगाच्या मांसाचे ठिपके होते. मात्र त्यांना यामुळे शोधायला जास्त वेळ लागला नाही. हे ठिपके क्रोकोडाइल या नावाने बदनाम अंमलीपदार्थामुळे आले होते. ते पेशन्ट इंजेक्शनने घेत असे. 2002 पासून रशियाचे नव्हेतर जगातील सर्व भागातील लोकांना आपल्या कवेत घेतले आहे. वैद्यकीय वापरासाठी लावला होता शोध...

- ऑनलाईन वेगामुळे व्हायरल झालेल्या या फ्लॅश इटिंग ड्रगला- वैदकीय वापरासाठी 1932 मध्‍ये शोधण्‍यात आले.
- सर्वप्रथम स्वित्झर्लंड व रशियामध्‍ये त्याचा वापर अनावर वेदनांवर उपचार करण्‍यासाठी वापरले जात होते.
- 2002 मध्‍ये रशियापासून हे अंमलीपदार्थ जगाच्या दृष्‍टीक्षेपात आलेे. वेगाने ते सैबेरियापासून पूर्ण देश आपल्या कब्जात घेतला.
- इतर अंमलीपदार्थांपेक्षा हे जास्त प्रभावी व स्वस्तही आहे. हिरॉइन घेणा-यांसाठी हा एक पर्याय आहे.
- रशियात हिरॉइनचे नशासाठी मोठ्याप्रमाणावर वापर केला जातो.
- येथे हिरॉइनचे व्यसन करणा-यांना जास्त दिवस ते घ्‍याला परवडत नसल्यास लोक क्रोकोडाइलची नशा करायला लागतात.
- इतर अंमलीपदार्थांच्या तुलनेत 20 पटीने स्वस्त असल्याने त्याचा वापर जास्त होत आहे.
- किंमत जितके कमी आहे, तितके त्याचे दुष्‍परिणाम वाईट आहेत.
क्रोको‍डाइलचा धोका
- रशियात प्रसिध्‍द असलेले हे अंमलपदार्थ गॅ‍सोलिन, पेंट थिनर, तेल व अल्कोहोलसारख्‍या कोडेन व हायड्रोकार्बन्सचे मिश्रण आहे.
- रशियात मोठ्याप्रमाणावर वापरल्या जाणा-या या धोकादायक अंमलीपदार्थाचा परिणाम खूप घातक असतो.
- ते घेतल्यास एक महिन्यानंतर त्याचा प्रभाव दिसायला लागतो.
- नसांमध्‍ये इंजेक्ट केल्यानंतर हे पेशींना इजा पोहोचायला सुरुवात करतात.
- अंमलीपदार्थाचा डोस नसमध्‍ये न गेल्यास मांस कुजायला सुरुवात होते.
- यामुळे त्वचा जाड व काळे ठिपके असलेल्या मगरीच्या कातड्याप्रमाणे बनते.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...