आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worlds First Chocolate Bath Is Worth Ten Thousand Pounds

PHOTOS: गर्लफ्रेंडला चॉकलेटने अंघोळ घालण्यासाठी खर्च केले नऊ लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - 'मुझे नौलखा मंगा दे रे...', हे भारतीय सौदर्यवतींचे आपल्या पती-प्रियकराकडे मागणे असते. मात्र, आपल्या प्रियतमेला नऊ लाखांची अंघोळ घालणारा एक प्रेमवीर लंडनमध्ये आढळून आला आहे.

मल्टी मिलेनिअर डॅनी लँबो स्वतःला सर्वात मोठा प्लेबॉय म्हणवून घेतो. त्याने स्वतःचा दावा खरा ठरविण्यासाठी आपल्या गर्लफ्रेंडला साडे नऊ लाख रुपयांच्या पाण्याने अंघोळ घातली. अर्थात ते काही पाणी नव्हते, तर हॉटेल मालक असलेल्या 37 वर्षीय डॅनी लँबोने गर्लफ्रेंड नताशा फ्लिनसाठी चॉकलेट मिल्कने भरलेला बाथ टब सज्ज केला होता. त्यात डुंबण्याचा स्वर्गीय आनंद तिने घेतला. चॉकेलट मिल्कने भरलेल्या टबमध्ये प्रियतमेला अंघोळ घालण्यासाठी डॅनीने 10,000 पौंड (जवळपास साडे नऊ लाख रुपये) खर्च केले.
डॅनीचे खरे आडनाव कार्ने आहे. त्याचे म्हणणे आहे, की लॅम्बॉर्गिनी कारचा चाहता असल्यामुळे लोक त्याला लॅम्बो नावाने ओळखतात. गर्लफ्रेंडला दिलेल्या या महागड्या इस्टर गिफ्ट बद्दल त्याने सांगितले, की क्लिओपात्रा ही तिच्या शान-शौकीसाठी प्रसिद्ध होती, ती बाथटबमध्ये पाण्याएवजी चॉकलेट मिल्क वापरत होती, माझ्या राणीसाठीही हेच गिफ्ट सर्वोत्तम होते.
तो म्हणाला, 'इजिप्तच्या दौर्‍यात मला क्लिओपात्राबद्दल अधिक माहिती मिळाली. मला आश्चर्य वाटले की सौंदर्य राखण्यासाठी ती गाढवीणीच्या दुधाने अंघोळ करीत होती. त्यातून मला कल्पना सुचली आणि माझ्या गर्लफ्रेडला देखील हा अनुभव मिळावा असे मला वाटले. मात्र त्यात काहीतरी बदल असावा म्हणून मी चॉकलेट मिल्कचा वापर करण्याचे ठरविले.'
त्यासाठी डॅनीने लंडनमधील सर्वात मोठी बाथरुम प्रॉडक्ट कंपनी बाथस्टोअरच्या कर्मचार्‍यांना यासाठी राजी केले. डॅनी 25 मिलिअन पौंड संपत्तीचा मालक आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, चॉकलेट मिल्क बाथ आणि डॅनी लँबोच्या कार