आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये जगातील पहिले इंटरनेट न्यायालय; ऑनलाइन शॉपिंग, बँक ट्रान्झॅक्शन आदी खटले चालतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनच्या हांगझोऊमध्ये जगातील पहिले इंटरनेट न्यायालय सुरू झाले आहे. या न्यायालयातील कामकाजाची प्रक्रिया सामान्य न्यायालयांपेक्षा भिन्न व सोपी आहे. इथे कोणीही ऑनलाइन खटला दाखल करू शकतो. पीडित, खटल्याशी संबंधित पक्षकार, साक्षीदार व वकिलांना न्यायालयात हजर राहण्याचीही आवश्यकता असत नाही. न्यायाधीशांसमोर स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉपद्वारे व्हिडिओ चॅटने आपली बाजू मांडता येते. यानंतर न्यायाधीश निकालही ऑनलाइन सुनावतात आणि त्याची प्रत संबंधित पक्षांना मेल आयडीवर पाठवली जाते.  
न्यायालयाचा कक्ष हायटेक करण्यात आला आहे. ऑनलाइन पुरावे एकत्र करून खटल्याची सुनावणी कशी केली जावी, याचे प्रशिक्षण न्यायाधीशांना दिले आहे. इंटरनेट न्यायालयात ऑनलाइन शॉपिंग, बँक ट्रान्झॅक्शन,  कॉपीराइट, करार, हॅकिंग, कर्ज आदींशी संबंधित प्रकरणांची लाइव्ह सुनावणी होईल. बीजिंग विद्यापीठातील प्रा. सी. यांगजियांग म्हणाले, या न्यायालयाचा उद्देश इंटरनेटच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात बदल घडवणे हा आहे.   

कम्युनिकेशन युनिव्हर्सिटी ऑफ चायनामध्ये विधी विषयाचे प्रा. वांग शिझिन म्हणाले, जगातील न्यायालयीन प्रणालीसाठी हे मॉडेल ठरेल. इंटरनेट न्यायालय एकप्रकारचे अभ्यासकेंद्र आहे. इंटरनेट न्यायालयाची स्थापना जून महिन्यात केली, मात्र त्याची सुरुवात शुक्रवारी झाली. देशातील वाढत्या गुन्हेगारी खटल्यांचा निपटारा करणे हा त्यामागचा उद्देश आहे. देशातील सर्वात मोठ्या ऑनलाइन कंपनीचे मुख्यालय हांगझोऊ येथे असल्यामुळे इंटरनेट न्यायालयासाठी या शहराची निवड केली. यामध्ये अलिबाबाचा समावेश आहे. या वर्षी जूनमध्ये हांगझोऊ न्यायालयाने अलिबाबाच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म टाओबाओसंदर्भात बनावट विश्लेषण लिहिल्याबद्दल एकास ५ वर्षे ९ महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला होता.

२०१६ मध्ये जगात १.५८ लाख कोटींची ऑनलाइन फसवणूक
२०१६ मध्ये जगात १.५८ लाख कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली. जगात २०१५ मध्ये ४.३३ अब्ज नॉन कॅश बँक ट्रान्झॅक्शन झाले. भारतात २०१६ मध्ये ४८० कोटी रुपयांचा ऑनलाइन व्यवहार झाला. २०१५ मध्ये एप्रिल ते डिसेंबरदरम्यान ११,९७७ ऑनलाइन घोटाळ्याचे खटले दाखल झाले. नोएडात ३,७०० कोटी रुपयांचा बनावट लाइक घोटाळा झाला.
 
बातम्या आणखी आहेत...