आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येथे सडताहेत करोडोच्या विंटेज कार्स, ज्याला पाहण्यासाठी 1700 रुपये तिकीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटलांटा- अमेरिकेतील अटलांटात जगातील सर्वात मोठे जंकयार्ड आहे जे 34 एकरात पसरलेले आहे. या जंकयार्डमध्ये कोट्यावधी रुपयेंच्या जुन्या विंटेज कार्स गंज खात पडल्या आहेत. हे जगातील सर्वात जुने जंकयार्ड सुद्धा असून, 1972 आणि त्यापेक्षाही जुन्या जवळपास 4500 कार तेथे सडत आहेत. लेविस फॅमिलीची देन आहे हे जंकयार्ड...
- या जंकयार्डचा सध्याचा मालक डीन लेविसने सांगितले की, त्याच्या वडिलाने 1931 मध्ये एक स्टोर सुरु केले होते जेथे नट-बोल्टपासून ते कार पार्ट्स, टायर्स आणि गॅसोलीन विकले जायचे.
- 1940 मध्ये हे स्टोर एका जंकयार्डमध्ये बदलले गेले. मात्र, डीनच्या डोक्यात काहीतरी वेगळेच चालू होते.
- त्याने या जुन्या कार्समधून प्रॉफिट कमविण्याऐवजी त्याचे जतन (प्रिजर्व) करण्याचे ठरवले.
- डीनने सांगितले की, जसे-जसे त्याचे वय वाढत गेले तस तसे त्याने लोन घेऊन अशा जुन्या विटेंज कार गाड्या खरेदी करायला सुरुवात केली.
- तसेच या गाड्या त्याने आपल्या जंकयार्डमध्ये प्रिजर्व करायला सुरुवात केली.
- आता हे जंकयार्ड नेचर, आर्ट आणि हिस्ट्रीचे एक म्यूझियम बनले आहे. विजिटर्स येथे फिरायला येतात.
- तसेच हे जंकयार्ड पाहण्यासाठी त्यांना 1700 रुपये तिकीट ठेवले गेले आहे.
- तसेच जर आपल्याजवळ कॅमेरा ठेवायचा असेल तर तिकीटाचे दर वेगळे व वाढीव आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जगातील सर्वात मोठ्या या जंकयार्डमध्ये सडत असलेल्या या विंटेज कार्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...