आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीत सुरू झाली जगातील सर्वात मोठी एक्स-रे लेझर; 11 देशांच्या वैज्ञानिकांनी 8 वर्षांत बनवले यंत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन- जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरात जगातील सर्वात मोठी एक्स-रे लेझर मशीन शुक्रवारपासून सुरू झाली. त्याच्या मदतीने वैज्ञानिकांना जगातील सर्वात सूक्ष्म कण, व्हायरस आणि रासायनिक प्रक्रियांतील जटिलता समजण्यास मदत होईल. या लेझरचा मोठा भाग जमिनीपासून ३८ मीटर खाली आहे. प्रयोगासाठी ३.४ किमी लांब भुयार बनवले आहे.

- या प्रकल्पात काम करणाऱ्या वैज्ञानिकांच्या मते, तिच्या मदतीने संशोधक पदार्थाच्या आत खोलवर पाहू शकतील.
- नॅनो स्तरावर स्नॅपशॉट घेण्यासाठी फिल्म्स बनवू शकतील. व्हायरसचा आण्विक डिटेल मॅप करू शकतील. ३-डी इमेज बनवू शकतील.

सध्याच्या तंत्रज्ञानापेक्षा अब्ज पट चांगला परिणाम
- जर एखादा व्हायरस शरीरात प्रवेश करून नुकसान पोहोचवत असेल तर त्याची पूर्ण प्रक्रिया रेकॉर्ड केली जाऊ शकते. अनेक रोगांची माहिती मिळण्यासोबतच योग्य उपचार शोधला जाऊ शकतो.
- सध्याच्या एक्स-रेद्वारे मिळणाऱ्या परिणामांच्या तुलनेत हा अनेक अब्ज पटींना चांगला परिणाम देईल.

प्रकल्पावर ११ देशांचे १२ हजार कोटी रु. खर्च
प्रकल्पावर १२ हजार कोटी रुपये खर्च झाले. हा एक्स-रे बनवण्यासाठी ८ वर्षे लागली. रशियासह ११ देशांनी निधी दिला. लाँचिंगच्या वेळी जगभरातील ८०० वैज्ञानिक हजर होते. जर्मनीची ५७% आणि रशियाची २७% भागीदारी आहे. डेन्मार्क, फ्रान्स, हंगेरी, पोलंड, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड हे इतर भागीदार आहेत.
बातम्या आणखी आहेत...