आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात महागड्या टायर्सची कोटींमध्ये झाली विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- एखाद्याचे कारप्रेम किती असू शकते याचा अंदाज बांधता येणे कठीण आहे. येथील एका टायर उत्पादक कंपनीच्या सोने आणि हिऱ्याने मढवलेल्या चार टायर्सचा संच चक्क कोटी रुपयांत विकला आहे. येथील झेड टायर्सने तयार केलेल्या या टायर्सची गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

टायर्स २४ कॅरेट सोने आणि निवडक हिऱ्यांनी मढवलेली आहेत.अनिवासी भारतीयाची ही कंपनी आहे. गोल्ड प्लेटेड कार टायर्सचा पहिला आणि एकमेव संच येथील झेड टायर्सने तयार केला. इटलीच्या अर्टिसन ज्वेलर्सने टायर्सवर सोने आणि हिऱ्याची कलाकुसर केली आहे. त्याचे डिझाइन दुबईत तयार करण्यात आले होते. जगातील सर्वात महागडी कार टायर्स म्हणून याची गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. दुबईतील व्यापार मेळ्यात त्यंाची २.२ दिरहॅम्समध्ये(साधारण ४.०१ कोटी रुपये) विक्री झाली. कंपनी ही रक्कम झेनिसेस फाउंडेशनला दान करणार आहे.