आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जगातील सगळ्यात छोटा DJ, AJच्या म्युझिक ट्रॅकवर दंग झालाय दक्षिण आफ्रिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः दोन वर्षाचा एजे)
टॅलेंट असेल तर तुमचे वय कितीही असो तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. हे दक्षिण आफ्रिकेतील दोन वर्षाच्या चिमुरड्याने सिद्ध करून दाखवले आहे. ज्या वयात मुले खोड्या करतात, त्याच वयात हा मुलगा चक्क साउंड सिस्टमशी खेळतो. जगतील सगळ्यात छोट्या डिस्क जॉकीचे (DJ) नाव AJ असे आहे. त्याने तयार केलेल्या म्युझिक ट्रॅकवर संपूर्ण दक्षिण आफ्रिका दंग झाला आहे.
AJ चे खरे नाव Oratilwe Hlongwane असे आहे. इतक्या अल्प वयात AJ आपल्या वडिलांच्या लॅपटॉपवर म्युझिक ट्रॅक सिलेक्ट करून प्ले करता येते. साउंड ट्रॅकवर AJ परफॉर्म करतो तेव्हा त्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी लोकांची झुंबड उडते. AJ चा व्हिडिओ आता संपूर्ण साउथ आफ्रिकेत व्हायरल झाला आहे.
AJ ची आई रिफेलियो मारुमो हिने सांगितले की, AJ चा जन्मही झालेला नव्हता, तेव्हा त्याचे वडील त्याच्यासाठी एक आयपॅड घेऊन आले होते. त्यावर एज्युकेशनल अॅप डाउनलोड करून AJला अभ्यासात मदत होईल, असे त्याचा उद्देश होता. परंतु, आयपॅडवर AJ च्या वडिलांनी एक म्युझिक अॅप डाउनलोड केले. त्यातूनच AJ प्रेरणा घेऊन इथपर्यंत प्रगती साधली. AJ चे वडील देखील DJ आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, AJ चा व्हिडिओ आणि फोटो...